news
‘शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राची बदनामी खपवून घेणार नाही’; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ नावावरून राजकीय वाद पेटला!‘पर्यावरण व शिक्षणातील क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाच्या हस्ते महामानवाला अभिवादन’; सोनम वांगचुक व गीतांजली वांगचुक यांच्या आगमनाने अमरावतीत उत्साह!‘मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कटिबद्ध’; पिंपरीतील यशवंतनगर एसआरए प्रकल्पात मिळणार हक्काचा निवारा!‘वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त, मेट्रो ठेकेदारावर कठोर कारवाई करा’; मनसेचा प्रशासनाला इशारा!‘स्वच्छता आणि शाश्वत पर्यटनात महाराष्ट्राचा डंका’; देशातील ९ नवीन ‘ब्लू फ्लॅग’ किनाऱ्यांमध्ये राज्याचे ३ किनारे अव्वल!
Home पिंपरी चिंचवड ‘वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त, मेट्रो ठेकेदारावर कठोर कारवाई करा’; मनसेचा प्रशासनाला इशारा!

‘वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त, मेट्रो ठेकेदारावर कठोर कारवाई करा’; मनसेचा प्रशासनाला इशारा!

टिळक चौकातील खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी; आयुक्तांशी फोनवर चर्चा करत सचिन चिखले यांनी मांडली ठाम भूमिका | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

निगडीत महामेट्रोच्या निष्काळजीपणामुळे मुख्य जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले आक्रमक!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले , दि. १२ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: निगडी येथील टिळक चौक बस स्टॉप परिसरात सुरू असलेल्या महामेट्रोच्या कामादरम्यान ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी (पाईपलाईन) फुटल्याची गंभीर घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून वाया गेले असून, परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला होता. या प्रकाराविरोधात मनसेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले आणि प्रथम महिला नगरसेविका सौ. अश्विनी सचिन चिखले-मराठे यांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून टिळक चौक परिसरात महामेट्रोच्या पिलरचे काम सुरू आहे. या कामाच्या लगतच महापालिकेची मुख्य जलवाहिनी असतानाही ठेकेदाराने काम करताना कोणतीही पूर्वकाळजी घेतली नाही. परिणामी ही जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले, ज्यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

या संदर्भात माहिती देताना मनसेने म्हटले आहे की, महामेट्रोच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अशा प्रकारच्या घटना आतापर्यंत ४ ते ५ वेळा घडल्या आहेत. तसेच, श्रीकृष्ण मंदिरासमोरील रस्ता गेल्या २ ते ३ वर्षांपासून पाईपलाईनच्या कामासाठी खोदून ठेवण्यात आला आहे. हे काम अद्यापही अपूर्ण असल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीविताला रोजच अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

ही गंभीर परिस्थिती निदर्शनास येताच मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी तात्काळ महापालिका आयुक्तांशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. यावेळी फुटलेली जलवाहिनी तातडीने दुरुस्त करणे, रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजवणे आणि हलगर्जीपणा करणाऱ्या मेट्रो ठेकेदारावर कठोर कारवाई करणे, याबाबत ठाम भूमिका मांडण्यात आली.
तसेच, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तातडीने तक्रार नोंदवून पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेत सकाळी जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण केली. मात्र, वारंवार होणाऱ्या या त्रासातून नागरिकांची कायमस्वरूपी सुटका करावी, अशी मागणी सचिन चिखले आणि नगरसेविका सौ. अश्विनी चिखले-मराठे यांनी केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!