news
‘शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राची बदनामी खपवून घेणार नाही’; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ नावावरून राजकीय वाद पेटला!‘पर्यावरण व शिक्षणातील क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाच्या हस्ते महामानवाला अभिवादन’; सोनम वांगचुक व गीतांजली वांगचुक यांच्या आगमनाने अमरावतीत उत्साह!‘मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कटिबद्ध’; पिंपरीतील यशवंतनगर एसआरए प्रकल्पात मिळणार हक्काचा निवारा!‘वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त, मेट्रो ठेकेदारावर कठोर कारवाई करा’; मनसेचा प्रशासनाला इशारा!‘स्वच्छता आणि शाश्वत पर्यटनात महाराष्ट्राचा डंका’; देशातील ९ नवीन ‘ब्लू फ्लॅग’ किनाऱ्यांमध्ये राज्याचे ३ किनारे अव्वल!
Home पिंपरी चिंचवड ‘शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राची बदनामी खपवून घेणार नाही’; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ नावावरून राजकीय वाद पेटला!

‘शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राची बदनामी खपवून घेणार नाही’; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ नावावरून राजकीय वाद पेटला!

चित्रपटाच्या शीर्षकातून 'महाराष्ट्र' शब्द न हटवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा; शहराध्यक्ष प्रवीण कदम व पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावाला संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध; शीर्षकातून ‘महाराष्ट्र’ शब्द वगळण्याची मागणी!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. १२ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: आगामी ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ (Maharashtra Epstein Files) या प्रस्तावित चित्रपटाच्या शीर्षकावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. गुन्हेगारी आणि लैंगिक शोषणासारख्या किळसवाण्या विकृतीवर आधारित या चित्रपटाच्या नावापुढे ‘महाराष्ट्र’ हा शब्द जोडणे हा राज्याच्या पवित्र विचारांचा आणि अस्मितेचा घोर अपमान असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष प्रवीण कदम यांच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चित्रपटाच्या नावातून ‘महाराष्ट्र’ शब्द तात्काळ वगळण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, शिवराय, फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या महाराष्ट्रात खरातसारखी भोंदू विकृती निर्माण होणे व त्यातून शेकडो महिलांचे लैंगिक शोषण होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अशा विकृतींना आळा बसावा आणि समाजजागृती व्हावी या उद्देशाने चित्रपट बनत असेल, तर त्याचे स्वागतच आहे. मात्र, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीशी थेट ‘महाराष्ट्र’ या गौरवशाली नावाची सांगड घालणे हे अत्यंत आक्षेपार्ह आणि राज्याच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेला धक्का लावणारे आहे.
संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून ती छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांची संतांची भूमी आहे. आम्हाला चित्रपट निर्मिती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य असले, तरी त्याचा वापर करताना राज्याच्या ऐतिहासिक आणि सामाजिक प्रतिष्ठेचा विचार करणे आवश्यक आहे.
संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख मागण्या- १. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाच्या शीर्षकातून तात्काळ ‘महाराष्ट्र’ हे नाव वगळण्यात यावे.
२. चित्रपटाच्या कथानकाला जाणीवपूर्वक ‘महाराष्ट्र’ हे नाव जोडण्यामागील खोडसाळपणाची सखोल चौकशी करावी.
३. राज्याच्या नावाचा अनावश्यक वापर टाळून चित्रपटाचे पर्यायी शीर्षक निश्चित करण्याचे निर्देश निर्माते व दिग्दर्शकांना द्यावेत.
४. या निवेदनावर प्रशासनाने केलेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात कळवावी.
महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान राखणे ही सामूहिक जबाबदारी असून प्रशासनाने या निवेदनाची तात्काळ व गांभीर्याने दखल घ्यावी; अन्यथा होणाऱ्या परिणामांना प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. हे निवेदन शहराध्यक्ष प्रवीण कदम, संघटक वैभव गजधने, विनोद माने आणि चिंचवड विभागाध्यक्ष श्याम पाटील यांच्या वतीने सादर करण्यात आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!