news
‘५० टक्के आरक्षणाची मर्यादा पाळण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय’; अमरावतीतील ग्रामपंचायत सरपंच पदांचे आरक्षण पुन्हा निश्चित होणार!‘हिंदी-मराठी सदाबहार गीतांनी नटसम्राट निळू फुले नाट्यगृह दुमदुमले’; विविध भारती म्युझिकल इव्हेंटचा वर्धापन दिन सोहळा यशस्वी!‘हक्काची जागा आणि सन्मान मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार’; काशिनाथ नखाते यांच्या न्यायालयीन लढ्याला मोठे यश!‘शिक्षण संस्थेच्या निधीत कोट्यवधींचा गैरव्यवहार आणि अनधिकृत बांधकामे’; धर्मादाय आयुक्तांच्या निरीक्षक अहवालाने शिक्षण क्षेत्रात खळबळ!‘मोशीत उसळला भक्तीचा महासागर; विश्व श्रीराम सेनेच्या छटपूजा महोत्सवात काशीच्या धर्तीवर गंगा आरती!
Home पिंपरी चिंचवड ‘ज्येष्ठांच्या कलागुणांना व्यासपीठ आणि स्नेहाचा उत्सव’; सांगवी परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा स्तुत्य सांस्कृतिक उपक्रम!

‘ज्येष्ठांच्या कलागुणांना व्यासपीठ आणि स्नेहाचा उत्सव’; सांगवी परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा स्तुत्य सांस्कृतिक उपक्रम!

नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आयोजन; नोव्हेंबर महिन्यातील वाढदिवस असलेल्या सभासदांचाही स्नेहपूर्ण सन्मान | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सांगवी परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या संगीत मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध; ज्येष्ठ सभासदांचे वाढदिवसही उत्साहात साजरे!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी सुनील पोकरे , दि. १६ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

सांगवी: सांगवी परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठ सभासदांसाठी एका बहारदार संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. संघातील नवोदित गायकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, या स्तुत्य उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मैफिलीतील सुमधुर गीतांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष कमलाकर जाधव, सचिव सुरेंद्र शेळके, ह.भ.प. वाघ महाराज, रामदासजी कामठे, श्रीकांत बाबर यांच्यासह संघाचे सुमारे पन्नास ज्येष्ठ सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष कमलाकर जाधव यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली.

या संगीत मैफिलीत अभंग, नाट्यपदे, भावगीते तसेच लोकप्रिय मराठी व हिंदी चित्रपटांतील सदाबहार गीते सादर करून ज्येष्ठ गायकांनी उपस्थितांची मने जिंकली. रामदासजी कामठे यांनी ‘प्रथम तुला वंदितो’ या गीताने मैफिलीची दमदार सुरुवात केली. संजय जोशी यांनी’नारायणा रमानामांना’ हा अभंग सादर केला. अशोक भोसले यांनी’या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या भावगीताने दाद मिळवली. श्रीकांत बाबर यांनी’सखी मंद झाल्या तारका’ हे नाट्यगीत सादर केले. अप्पासाहेब पाटील यांनी’मैं कभी कवि न बनता’ हे हिंदी गीत गायले. कमल धुमाळ यांनी’अखियों के झरोखे से’ या गीताने वातावरणात गोडवा निर्माण केला. सुरेश सोनावणे यांनी’रिमझिम गिरे सावन’ आणि ‘सुलग सुलग जाये’ ही गाणी सादर केली. जयंत पाटील यांनी ‘सूर ते छेडिता’ या गीताला रसिकांची पसंती मिळाली. धनाजी कोल्हे यांनी ‘कभी कभी मेरे दिल में’ या अजरामर गीताने मैफिलीत रंगत आणली.

या सर्व गीतांना उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्रीकांत बाबर व शुभदा मोरे यांनी प्रत्येक गाण्यामागील चित्रपटाची माहिती, संगीतकार आणि गायकांचा परिचय करून देत कार्यक्रमाचे बहारदार निवेदन केले.

याच कार्यक्रमात नोव्हेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ सभासदांचे वाढदिवसही अत्यंत उत्साहात साजरे करण्यात आले आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत बाबर, कमलाकर जाधव, सुरेंद्र शेळके आणि शिवाजी बंडगर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपाहार व चहापानाने या आनंददायी मैफिलीची सांगता झाली.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!