news
‘५० टक्के आरक्षणाची मर्यादा पाळण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय’; अमरावतीतील ग्रामपंचायत सरपंच पदांचे आरक्षण पुन्हा निश्चित होणार!‘हिंदी-मराठी सदाबहार गीतांनी नटसम्राट निळू फुले नाट्यगृह दुमदुमले’; विविध भारती म्युझिकल इव्हेंटचा वर्धापन दिन सोहळा यशस्वी!‘हक्काची जागा आणि सन्मान मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार’; काशिनाथ नखाते यांच्या न्यायालयीन लढ्याला मोठे यश!‘शिक्षण संस्थेच्या निधीत कोट्यवधींचा गैरव्यवहार आणि अनधिकृत बांधकामे’; धर्मादाय आयुक्तांच्या निरीक्षक अहवालाने शिक्षण क्षेत्रात खळबळ!‘मोशीत उसळला भक्तीचा महासागर; विश्व श्रीराम सेनेच्या छटपूजा महोत्सवात काशीच्या धर्तीवर गंगा आरती!
Home पिंपरी चिंचवड ‘हिंदी-मराठी सदाबहार गीतांनी नटसम्राट निळू फुले नाट्यगृह दुमदुमले’; विविध भारती म्युझिकल इव्हेंटचा वर्धापन दिन सोहळा यशस्वी!

‘हिंदी-मराठी सदाबहार गीतांनी नटसम्राट निळू फुले नाट्यगृह दुमदुमले’; विविध भारती म्युझिकल इव्हेंटचा वर्धापन दिन सोहळा यशस्वी!

माजी महापौर शकुंतला धराडे व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखदार सोहळा संपन्न; विनायक कदम व नंदकुमार कांबळे यांचे यशस्वी आयोजन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘विविध भारती म्युझिकल इव्हेंट’चा तिसरा वर्धापन दिन उत्साहात संपन्न; ‘छायागीत’च्या सुरेल मैफलीने रसिक मंत्रमुग्ध!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. १६ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: ‘विविध भारती म्युझिकल इव्हेंट’ या संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘छायागीत’ हा नव्या-जुन्या गाजलेल्या हिंदी व मराठी गीतांचा विशेष संगीत कार्यक्रम रविवारी (दि. १५ नोव्हेंबर) सांगवीतील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. संस्थेचे संस्थापक विनायक कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, तर संकल्पना नंदकुमार कांबळे यांची होती.

या सोहळ्याला माजी महापौर शकुंतला धराडे, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा तृप्ती कांबळे, दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, उपाध्यक्ष संतोष बाबर, संचालक सचिन साठे, राजेश सावंत, महेंद्र चिंचवडे, साहित्यिक अनिल दीक्षित, कॉसमॉस बँकेचे संदीप क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते नितीन यादव, शरद शेजवळ, राणू कदम, राजेंद्र देसाई, रवींद्र लांडगे, घमाजी लांडगे, प्रकाश कानडे, प्रकाश गायकवाड, गणेश पठारे, संदीप शिर्के, नरेंद्र मोहिते, उद्योजक रामदास यादव, सुरेश साठे, सुजाता सुतार, खंडू ववले आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या संगीतमय संध्येत शास्त्रीय संगीतावर आधारित हिंदी गीतांसह दादा कोंडके, सुरेश वाडकर यांची लोकप्रिय गाणी आणि डिस्कोच्या ठेक्यावरील उडत्या चालींच्या गीतांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली.

मैफलीत मीरा शिंदे, सुजाता माळवे, पूनम झांबरे, जहांगीर पठाण, सूर्यकांत ताम्हाणे, डॉ. कविता बोंडे, स्मिता गायकवाड, शैलेंद्र पाटील, स्वाती पाटील, डॉ. आरोही पाटे, नेहा गायकवाड, सतीश कापडी, शीलरतन बंगाळे, डॉ. संदीप गायकवाड, सुधाकर बाविस्कर, विजय सांबारे, राजू शिरसाट, दामोदर घनतोडे, डॉ. किशोर वराडे, राजेंद्र पगारे, अनिल जंगम, बळवंत कणसे, प्रतिभा ताटकर, छाया घुले पाटील, नंदकुमार कांबळे आणि विनायक कदम या गायक कलाकारांनी एकापेक्षा एक सरस एकल व युगल गीते सादर करत रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार कांबळे यांनी केले, तर संदीप साकोरे यांनी आपल्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत शेवटपर्यंत कायम ठेवली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आकाश गाजूल, सौमिल घावटे, शैलेश घावटे, छाया घुले पाटील, सचिन शेटे आणि अनिल जंगम यांनी विशेष परिश्रम घेतले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!