news
‘५० टक्के आरक्षणाची मर्यादा पाळण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय’; अमरावतीतील ग्रामपंचायत सरपंच पदांचे आरक्षण पुन्हा निश्चित होणार!‘हिंदी-मराठी सदाबहार गीतांनी नटसम्राट निळू फुले नाट्यगृह दुमदुमले’; विविध भारती म्युझिकल इव्हेंटचा वर्धापन दिन सोहळा यशस्वी!‘हक्काची जागा आणि सन्मान मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार’; काशिनाथ नखाते यांच्या न्यायालयीन लढ्याला मोठे यश!‘शिक्षण संस्थेच्या निधीत कोट्यवधींचा गैरव्यवहार आणि अनधिकृत बांधकामे’; धर्मादाय आयुक्तांच्या निरीक्षक अहवालाने शिक्षण क्षेत्रात खळबळ!‘मोशीत उसळला भक्तीचा महासागर; विश्व श्रीराम सेनेच्या छटपूजा महोत्सवात काशीच्या धर्तीवर गंगा आरती!
Home अमरावती ‘५० टक्के आरक्षणाची मर्यादा पाळण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय’; अमरावतीतील ग्रामपंचायत सरपंच पदांचे आरक्षण पुन्हा निश्चित होणार!

‘५० टक्के आरक्षणाची मर्यादा पाळण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय’; अमरावतीतील ग्रामपंचायत सरपंच पदांचे आरक्षण पुन्हा निश्चित होणार!

नव्याने स्थापित ग्रामपंचायतींचेही प्रवर्गनिहाय आरक्षण ठरणार; निवडणूक प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांचे नागरिकांना उपस्थितीचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अमरावतीत सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये सुधारणा; सुधारित आरक्षण निश्चित करण्यासाठी २० नोव्हेंबरला विशेष सभा!

अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. १६ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्यामुळे, शासनाच्या निर्देशानुसार आरक्षणामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात येणार आहे. यामध्ये केवळ नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग (महिलांसह) यांच्या आरक्षणामध्ये बदल होत असून, यासाठी आगामी शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित सर्व तहसील कार्यालयांमध्ये विशेष आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये कोणतीही तफावत किंवा बदल करण्यात आलेला नाही. केवळ नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) व खुला प्रवर्ग (महिलांसह) यांच्या आरक्षणामध्येच हा बदल होणार आहे. सुधारित आरक्षण निश्चित करण्यासाठी तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण महिलांसह निश्चित करण्यासाठी या विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित सर्व तालुक्यांमध्ये प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार आणि नियंत्रण अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. तालुका निहाय अधिकार्‍यांची यादी पुढीलप्रमाणे आहे. अमरावती तालुका –अनिलकुमार भटकर, संतोष आठरे , भातकुली तालुका – महेश घाटुळे, अक्षय मांडवे , मोर्शी तालुका – प्रदिप पवार, सागर ढवळे , वरूड तालुका -प्रदिप पवार, रामदास शेळके , दर्यापूर तालुका – राजेश्वर हांडे, डॉ. रविद्रकुमार कानडजे , अंजनगाव सुर्जी तालुका – वैष्णवी बाविस्कर, पुष्पा दाभेराव , अचलपूर तालुका – बळवंत अरखराव, सुदर्शन शहारे , चांदूर बाजार तालुका – सुनिल टाकळे, योगेश गाडे , धामणगाव रेल्वे तालुका – तेजश्री कोरे, अभय घोरपडे

सुधारित आरक्षण सोडतीच्या या प्रक्रियेत संबंधित तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामपंचायत निवडणूक प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी केले आहे. या सोडतीमुळे ग्रामीण राजकारणातील आगामी गणितांना दिशा मिळणार असून, सर्वच तालुक्यांचे याकडे लक्ष लागले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!