news
‘५० टक्के आरक्षणाची मर्यादा पाळण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय’; अमरावतीतील ग्रामपंचायत सरपंच पदांचे आरक्षण पुन्हा निश्चित होणार!‘हिंदी-मराठी सदाबहार गीतांनी नटसम्राट निळू फुले नाट्यगृह दुमदुमले’; विविध भारती म्युझिकल इव्हेंटचा वर्धापन दिन सोहळा यशस्वी!‘हक्काची जागा आणि सन्मान मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार’; काशिनाथ नखाते यांच्या न्यायालयीन लढ्याला मोठे यश!‘शिक्षण संस्थेच्या निधीत कोट्यवधींचा गैरव्यवहार आणि अनधिकृत बांधकामे’; धर्मादाय आयुक्तांच्या निरीक्षक अहवालाने शिक्षण क्षेत्रात खळबळ!‘मोशीत उसळला भक्तीचा महासागर; विश्व श्रीराम सेनेच्या छटपूजा महोत्सवात काशीच्या धर्तीवर गंगा आरती!
Home पिंपरी चिंचवड ‘शिक्षण संस्थेच्या निधीत कोट्यवधींचा गैरव्यवहार आणि अनधिकृत बांधकामे’; धर्मादाय आयुक्तांच्या निरीक्षक अहवालाने शिक्षण क्षेत्रात खळबळ!

‘शिक्षण संस्थेच्या निधीत कोट्यवधींचा गैरव्यवहार आणि अनधिकृत बांधकामे’; धर्मादाय आयुक्तांच्या निरीक्षक अहवालाने शिक्षण क्षेत्रात खळबळ!

विनाठराव २.७५ कोटींचा निधी वर्ग केल्याचा आणि करचुकवेगिरीचा ठपका; प्रदीप कुमार नागवडे यांना मारहाण व शिक्षिका कांचन घुले यांच्या अन्यायकारक बदल्यांचाही आरोप | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दापोडीतील जनता शिक्षण संस्थेत कोट्यवधींची आर्थिक अनियमितता आणि मनमानी कारभार? धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालात गंभीर निरीक्षणे!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १६ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: दापोडी येथील नामांकित ‘जनता शिक्षण संस्था’ या सार्वजनिक न्यासाच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता, निविदा प्रक्रियेतील गोंधळ आणि मनमानी कारभार सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींवरून धर्मादाय आयुक्त कार्यालय, पुणे विभागामार्फत करण्यात आलेल्या निरीक्षक चौकशी अहवालात (चौकशी क्र. १५२/२०२५) अत्यंत गंभीर निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जगताप आणि सचिव सुभाष जावळे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेण्यात आले असून, दोषींवर महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० मधील कलम ३९ व कलम ८३ अन्वये फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे.

संबंधित बांधकामांसाठी अंदाजित खर्च १ कोटी ३७ लाख ३९ हजार ९७७ रुपये अपेक्षित असताना, विद्यमान कार्यकारी मंडळाने प्रत्यक्षात २ कोटी ३९ लाख ९५ हजार ५०६ रुपये खर्च केल्याचे दिसून आले आहे. यात तब्बल १ कोटी २ लाख ५५ हजार ५२९ रुपये अतिरिक्त खर्च झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  काही बांधकामांच्या निविदा प्रसिद्ध होण्यापूर्वीच कंत्राटदारांकडून निविदा प्राप्त झाल्याचे आणि मंजूर रकमेपेक्षा अधिक पैसे अदा केल्याचे अहवालात नमूद आहे.  शाळांमध्ये नवीन वर्गखोल्या व स्वच्छतागृहे बांधताना ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा संबंधित स्थानिक प्राधिकरणाच्या आवश्यक परवानग्या घेतल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणताही ठराव न करता पाच शाळांकडील एकूण २ कोटी ७५ लाख ४२ हजार ५४५ रुपये संस्थेच्या खात्यात वर्ग करण्यात आले. तसेच, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये आयकर टीडीएस (TDS) कपात न करणे आणि कंत्राटदारांकडून जीएसटी (GST) जमा न झाल्याने शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे निरीक्षकांनी म्हटले आहे.

आर्थिक गैरव्यवहारांसोबतच संस्थेतील प्रशासकीय दडपशाहीवरही तक्रारदारांनी बोट ठेवले आहे.  संस्थेतील ज्येष्ठ इंग्रजी शिक्षिका कांचन घुले यांनी शंभर टक्के निकाल देऊनही, केवळ प्रशासकीय आकसापोटी त्यांची वर्षभरात तब्बल तीन वेळा बदली करण्यात आल्याचा आरोप आहे.  संस्थेतील अनियमिततेबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रदीप कुमार नागवडे यांना अध्यक्ष व सचिवांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

“शिक्षण संस्था ही विद्यार्थी, पालक आणि समाजाच्या विश्वासावर उभी असते. संस्थेचा निधी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वापरला जाणे अपेक्षित आहे. मात्र, आर्थिक अनियमितता, शिक्षकांची मुस्कटदाबी आणि मारहाणीच्या तक्रारी अत्यंत गंभीर आहेत. कोणीही पदाचा गैरवापर करून कायद्यापेक्षा मोठा नाही; त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी.”

— तक्रारदार

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!