news
‘हरकतींचा फार्स करून वृक्षतोड केल्यास तीव्र जनआंदोलन उभारणार’; कार्यकर्ते, नागरिक आणि विद्यार्थ्यांचा इशारा!‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रथमच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पथविक्रेता समितीची महत्त्वपूर्ण बैठक’; प्रमाणपत्र व ओळखपत्र वाटपाची प्रक्रिया गतिमान होणार!‘अल्पवयीन पीडितेला अवघ्या काही महिन्यांत मिळाला न्याय’; एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या वेगवान तपासाचे सर्वत्र कौतुक!‘शहरातील नागरी सुविधा व पायाभूत कामांना वेग मिळणार’; स्थायी समितीच्या बैठकीत कोट्यवधींच्या विकास प्रस्तावांवर शिक्कामोर्तब!‘पाणी तुंबणाऱ्या भागांची प्रत्यक्ष पाहणी करून तत्काळ उपाययोजना राबवा’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश!
Home पिंपरी चिंचवड ‘शहरातील नागरी सुविधा व पायाभूत कामांना वेग मिळणार’; स्थायी समितीच्या बैठकीत कोट्यवधींच्या विकास प्रस्तावांवर शिक्कामोर्तब!

‘शहरातील नागरी सुविधा व पायाभूत कामांना वेग मिळणार’; स्थायी समितीच्या बैठकीत कोट्यवधींच्या विकास प्रस्तावांवर शिक्कामोर्तब!

'ड' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पाणीपुरवठा दुरुस्ती, मोरवाडी आयटीआयसाठी लिफ्ट आणि महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या सुविधांना मान्यता | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकासकामे आणि प्रस्तावांना मंजुरी!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २६ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत शहरातील विविध भागांतील विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, अग्निशमन यंत्रणा, आरोग्य सुविधा आणि उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीशी संबंधित विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

शहरातील पायाभूत सुविधा आणि दैनंदिन नागरी सेवा अधिक भक्कम करण्यासाठी पुढील कामांना मान्यता देण्यात आली. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कावेरी नगर टाकी व बायपास जलक्षेत्रातील पाणी वितरण व्यवस्थेचे परिचालन, देखभाल व दुरुस्ती करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. तसेच गवळीनगर, दिघी, चऱ्होली, भोसरी, थेरगाव, चिंचेचा मळा, कासारवाडी, रावेत, किवळे, मामुर्डी आदी परिसरांतील रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण, स्थापत्यविषयक देखभाल-दुरुस्ती, ड्रेनेज लाईन व चेंबर्सची दुरुस्ती आणि पावसाळी गटारांची साफसफाई करण्याच्या कामांना मान्यता मिळाली. सार्वजनिक स्वच्छतागृहांची दैनंदिन साफसफाई व देखभाल, रस्ते व गटर्सची साफसफाई, नालेसफाई, बांधकामाचा राडारोडा उचलणे तसेच अतिक्रमण कारवाईसाठी आवश्यक मशिनरी व मनुष्यबळ पुरवण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांना मुदतवाढ देण्यासही मान्यता दिली. याशिवाय आरोग्य कर्मचारी, त्यांची कुटुंबे, लहान मुले, युवा वर्ग आणि सार्वजनिक शौचालयांच्या सर्वेक्षणासाठी ३८ सर्वेक्षणकर्त्यांच्या नियुक्तीला कार्योत्तर मान्यता देत त्यांचे मानधन थेट बँक खात्यात जमा करण्यास मंजुरी देण्यात आली.

विभागाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अग्निशमन केंद्रांवर व्हीएचएफ वॉकीटॉकी आणि पीओसी वॉकीटॉकी यंत्रणा पुरवणे तसेच वायरलेस यंत्रणेत सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. विविध रस्त्यांवरील पावसाळी गटारांची साफसफाई, विद्युत दाहिनीचे परिचालन व देखभाल-दुरुस्ती तसेच मोरवाडी आयटीआय इमारतीसाठी लिफ्ट उभारण्याच्या कामांनाही मान्यता देण्यात आली. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने चिंचवड येथील ६ हजार चौरस मीटर आणि पुनावळे येथील ७ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ऑक्सिजन पार्क उद्यानांची केअरटेकरसह देखभाल करण्याचे काम १८ महिन्यांच्या कालावधीसाठी देण्यास मान्यता देण्यात आली.  वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढी विभागातील ब्लास्ट फ्रीझर उपकरणाच्या आठ वर्षांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी वार्षिक देखभाल करारास (सीएमसी) मंजुरी देण्यात आली. तसेच महापालिकेच्या कार्यक्रमांच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी फ्लेक्स व बॅनर्स छपाई-पुरवठा कामास मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला.

मोशी खाण परिसरातील कार्यक्रम, श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा, महापौर चषक, राज्यस्तरीय क्रीडा कार्यक्रम तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील व्यवस्थेसाठी तात्पुरती प्रकाश व्यवस्था, ध्वनिक्षेपण यंत्रणा, जनरेटर आणि सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावांना स्थायी समितीने मान्यता दिली.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!