news
‘हरकतींचा फार्स करून वृक्षतोड केल्यास तीव्र जनआंदोलन उभारणार’; कार्यकर्ते, नागरिक आणि विद्यार्थ्यांचा इशारा!‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रथमच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पथविक्रेता समितीची महत्त्वपूर्ण बैठक’; प्रमाणपत्र व ओळखपत्र वाटपाची प्रक्रिया गतिमान होणार!‘अल्पवयीन पीडितेला अवघ्या काही महिन्यांत मिळाला न्याय’; एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या वेगवान तपासाचे सर्वत्र कौतुक!‘शहरातील नागरी सुविधा व पायाभूत कामांना वेग मिळणार’; स्थायी समितीच्या बैठकीत कोट्यवधींच्या विकास प्रस्तावांवर शिक्कामोर्तब!‘पाणी तुंबणाऱ्या भागांची प्रत्यक्ष पाहणी करून तत्काळ उपाययोजना राबवा’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश!
Home पिंपरी चिंचवड ‘अल्पवयीन पीडितेला अवघ्या काही महिन्यांत मिळाला न्याय’; एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या वेगवान तपासाचे सर्वत्र कौतुक!

‘अल्पवयीन पीडितेला अवघ्या काही महिन्यांत मिळाला न्याय’; एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या वेगवान तपासाचे सर्वत्र कौतुक!

सपोनि मनिषा दशवंत आणि कोर्ट पैरवी अधिकारी संगिता सरसे यांच्या समन्वयामुळे आरोपीला शिक्षा; पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कामगिरी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

एमआयडीसी भोसरीतील अल्पवयीन पीडितेवरील विनयभंग प्रकरणात आरोपीस ५ वर्षांचा कारावास!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. २६ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

भोसरी: एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंद असलेल्या अल्पवयीन पीडितेवरील विनयभंग प्रकरणात पिंपरी-चिंचवड जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. एन. यादव यांनी आरोपी दिनेश बाबुराम चौधरी (वय २८ वर्षे) यास दोषी ठरवून ५ वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी न्यायालयाने हा निकाल दिला.

हा गुन्हा दि. ८ मे २०२६ रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७५(१) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) कलम ८, १०, १२ अंतर्गत दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सपोनि मनिषा दशवंत यांनी अवघ्या ३० दिवसांत पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटला जलदगतीने चालविण्याची विनंती अभियोग पक्षातर्फे करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने जलद सुनावणी पूर्ण करून न्यायनिर्णय दिला.

विशेष न्यायालयाने आरोपी दिनेश बाबुराम चौधरी याला विविध कलमांन्वये खालीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला आहे (सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगायच्या आहेत):

अ.क्र. कायदा व कलम कारावास दंड
१. भारतीय न्याय संहिता कलम ७५(१) २ वर्षे २,००० रुपये
२. पोक्सो (POCSO) कलम ८ ३ वर्षे २,००० रुपये
३. पोक्सो (POCSO) कलम १० ५ वर्षे २,००० रुपये
४. पोक्सो (POCSO) कलम १२ २ वर्षे २,००० रुपये

या खटल्यात विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. स्मिता चौगुले यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावीपणे बाजू मांडली, तर कोर्ट पैरवी अधिकारी म.पोहवा संगिता सरसे यांनी न्यायालयीन कामकाजात समन्वय साधला.

हा तपास व न्यायालयीन पाठपुरावा पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-३) मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!