news
‘हरकतींचा फार्स करून वृक्षतोड केल्यास तीव्र जनआंदोलन उभारणार’; कार्यकर्ते, नागरिक आणि विद्यार्थ्यांचा इशारा!‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रथमच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पथविक्रेता समितीची महत्त्वपूर्ण बैठक’; प्रमाणपत्र व ओळखपत्र वाटपाची प्रक्रिया गतिमान होणार!‘अल्पवयीन पीडितेला अवघ्या काही महिन्यांत मिळाला न्याय’; एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या वेगवान तपासाचे सर्वत्र कौतुक!‘शहरातील नागरी सुविधा व पायाभूत कामांना वेग मिळणार’; स्थायी समितीच्या बैठकीत कोट्यवधींच्या विकास प्रस्तावांवर शिक्कामोर्तब!‘पाणी तुंबणाऱ्या भागांची प्रत्यक्ष पाहणी करून तत्काळ उपाययोजना राबवा’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश!
Home पिंपरी चिंचवड ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रथमच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पथविक्रेता समितीची महत्त्वपूर्ण बैठक’; प्रमाणपत्र व ओळखपत्र वाटपाची प्रक्रिया गतिमान होणार!

‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रथमच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पथविक्रेता समितीची महत्त्वपूर्ण बैठक’; प्रमाणपत्र व ओळखपत्र वाटपाची प्रक्रिया गतिमान होणार!

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न; अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपायुक्त सीताराम बहुरे, समिती सदस्य व पोलीस अधिकारी उपस्थित | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच नियोजनबद्ध ‘हॉकर झोन’ची निर्मिती; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची ग्वाही!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २६ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील पथविक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध ‘हॉकर झोन’ निर्माण करण्याची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असून, शहरातील सर्व प्रभागांमध्ये योग्य जागांची पाहणी करून पथविक्रेत्यांना न्याय देण्यात येईल. तसेच, उर्वरित पात्र पथविक्रेत्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र वाटपाची प्रक्रिया सुलभ आणि गतिमान करण्यात येईल, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पथविक्रेता समितीचे अध्यक्ष तथा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.

महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर २०२३ नंतर प्रथमच बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) पथविक्रेता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

शहरातील पथविक्रेत्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयुक्तांनी पुढील महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. शहरातील सर्व प्रभागांतील संभाव्य हॉकर झोनच्या जागांची पाहणी करून पथविक्रेत्यांना सुसज्ज जागा आणि आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहील. बोगस सर्वेक्षण आणि बोगस प्रमाणपत्रांच्या प्रकरणांवर कठोर कारवाई केली जाईल. उर्वरित पात्र विक्रेत्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाईल आणि पथविक्रेता समितीच्या बैठका नियमितपणे घेतल्या जातील.

या बैठकीत महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी शहरातील सुमारे ३० हजार पथविक्रेत्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पथविक्रेता कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली.  “या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संघटनेने रस्त्यावरील आंदोलनासोबतच न्यायालयीन लढा दिला. चार वर्षांनी प्रमाणपत्र वाटप सुरू झाले, आता हॉकर झोन निर्मितीसाठी आणखी पाच वर्षे घालवता कामा नयेत. पुढील चार महिन्यांत झोन निश्चित करून पात्र विक्रेत्यांना ओळखपत्रांसह कायमस्वरूपी व्यवसायाची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी,” अशी मागणी नखाते यांनी केली.  पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी होत असताना पथविक्रेत्यांना आधुनिक सुविधा, स्वच्छता आणि शिस्तबद्ध जागा देऊन ‘स्मार्ट हॉकर’ संकल्पना राबवावी. यामुळे शहराचे सौंदर्य, वाहतूक व्यवस्था आणि विक्रेत्यांचा रोजगार यांचा समतोल साधला जाईल, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. संकुचित दृष्टिकोनातून कारवाई न करता कायद्यानुसार काम करावे; प्रामाणिक विक्रेत्यांना संरक्षण देऊन बोगस सर्वेक्षणाद्वारे प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपायुक्त सीताराम बहुरे, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, समिती सदस्य किरण साडेकर, राजू बिराजदार, अलका रोकडे, सलीम डांगे, शंकर पवार, उत्तम सकटे, तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि वाहतूक पोलीस प्रतिनिधी उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!