पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिका पारंपरिक शिक्षणाला आधुनिकतेची जोड देत गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महापालिका अत्यंत सकारात्मक पाऊले टाकत असून शहराच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी काढले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. १८, चिंचवड येथील केशवनगर शाळेच्या नवीन पाच मजली इमारतीचे भूमिपूजन आमदार शंकर जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसदस्य सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नामदेव ढाके, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, मोरेश्वर शेडगे, विठ्ठल भोईर, बिभीषण चौधरी, माजी नगरसदस्या आश्विनी चिंचवडे, मोनाताई कुलकर्णी, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, नितीन देशमुख, कार्यकारी अभियंता किरण अंदुरे, दिलीप भोसले, प्रशासन अधिकारी संगिता बांगर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता राजकुमार सूर्यवंशी, दमयंती पवार, सामाजिक कार्यकर्ते गतिराम भोईर, रविंद्र देशपांडे, माधव पाटील, शेखर चिंचवडे, शैलेंद्र गावडे, रविंद्र प्रभुणे, दिपाली कलापुरे, चैताली भोईर, गणेश ढोरे, सनी बारणे, अँड. हर्षल नढे, मधुकर बच्चे यांसह शिक्षक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

केशवनगर शाळेच्या या नव्या पाच मजली इमारतीच्या बांधकामासाठी महापालिकेने सुमारे २६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या इमारतीचे काम पुढील १८ महिन्यांत पूर्ण होणार असून, एकाच सत्रात सुमारे ११५० विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.
प्रत्येक मजल्यावरील अत्याधुनिक सुविधा:
- पहिला मजला: मुख्याध्यापक कार्यालय, स्टाफ रूम, प्रयोगशाळा, वाचनालय, ॲक्टिव्हिटी रूम, ग्रंथालय, ३ वर्गखोल्या, मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह.
- दुसरा मजला: संगणक कक्ष, स्टोअर रूम, मेडिकल रूम, ६ वर्गखोल्या, मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह.
- तिसरा मजला: मुख्याध्यापक कार्यालय, स्टाफ रूम, प्रयोगशाळा, वाचनालय, ॲक्टिव्हिटी रूम, ग्रंथालय, ३ वर्गखोल्या, मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह.
- चौथा मजला: संगणक रूम, स्टोअर, कन्सल्टेशन रूम, ६ वर्गखोल्या, मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह.
- पाचवा मजला: बहुउद्देशीय हॉल, भाषा कक्ष, पॅन्ट्री, ५ वर्गखोल्या, मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह.
याप्रसंगी आमदार शंकर जगताप यांनी राज्य शासनाच्या शंभर दिवसीय उपक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेने दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
#केशवनगरशाळा #भूमिपूजन #शंकरजगताप #पिंपरीचिंचवड #महापालिका #शिक्षण #आधुनिकता #गुणवत्तापूर्णशिक्षण #विकास #महाराष्ट्र
