news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेची अनधिकृत लोखंडी कमानीवर कारवाई; ७० हजारांचा दंड वसूल

पिंपरी-चिंचवड महापालिकेची अनधिकृत लोखंडी कमानीवर कारवाई; ७० हजारांचा दंड वसूल

आकाशचिन्ह व परवाना विभागाची धडक मोहीम; शहरातील बेकायदेशीर फलकांवरही कारवाईचा इशारा

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी-चिंचवड महापालिकेची अनधिकृत लोखंडी कमानीवर कारवाई; ७० हजारांचा दंड वसूल

आकाशचिन्ह व परवाना विभागाची धडक मोहीम; शहरातील बेकायदेशीर फलकांवरही कारवाईचा इशारा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने आज पठारे मळा, चऱ्होली येथील अजिंक्य डी. वाय. पाटील रोडवर असलेल्या एका अनधिकृत लोखंडी कमानीवर निष्कासनाची कारवाई केली. या कारवाईदरम्यान संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून सुमारे ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

उपायुक्त राजेश आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत परवाना निरीक्षक धनंजय पाटील, राजू वेताळ, किशोर गावडे, राजू चौधरी, धनसिंग धायगुडे आणि परवाना लिपिक कालिदास शेळके यांनी सहभाग घेतला. तसेच, धडक कारवाई पथकातील जवान आणि मजूर यांच्या मदतीने हायड्रॉलिक मशिनरीचा वापर करून ही अनधिकृत कमान हटवण्यात आली.

उपायुक्त राजेश आगळे यांनी नुकताच आकाशचिन्ह व परवाना विभागाचा पदभार स्वीकारला असून, यापुढेही शहरातील अनधिकृत जाहिरात फलक आणि कमानींवर निष्कासनाची कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

या कारवाईसंदर्भात अधिक माहिती देताना सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर म्हणाले की, शहरातील बेकायदेशीर फलक आणि कमानींवर निष्कासन कारवाई नियमितपणे केली जात आहे. महापालिका यंत्रणा अशा अनधिकृत अतिक्रमणांवर सतत लक्ष ठेवून आहे. त्यांनी नागरिकांना आणि व्यावसायिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. स्वतःहून अनधिकृत फलक आणि कमानी हटवण्याचे आवाहन त्यांनी केले असून, अन्यथा महापालिकेकडून त्या काढण्यात येतील आणि संबंधित व्यक्तींकडून दंड वसूल केला जाईल. इतकेच नव्हे, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे शहरातील अनधिकृत बांधकामे आणि जाहिरातबाजीला लगाम बसण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून शहराच्या सौंदर्याला जपण्यास मदत करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!