news
पिंपरी-चिंचवडमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना निश्चित! १७ लाखांहून अधिक मतदारांसाठी ३२ प्रभागांतून १२८ नगरसेवक निवडले जाणारपिंपरी-चिंचवडकरांनो, तयार राहा! महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; आयोगाकडून संपूर्ण वेळापत्रक जाहीरहक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण! प्रधानमंत्री आवास योजनेतील १९४५ सदनिकांची पारदर्शक सोडत; महापालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद – आमदार शंकर जगतापपिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला प्रशासकांकडून ‘ग्रीन सिग्नल’! गवळीनगरसह चऱ्होली, दिघी, चिखली परिसरात रस्ते व स्थापत्य कामांना मंजुरी‘हॅपिनेस स्ट्रीट २.०’ ठरला सामाजिक बांधिलकीचा उत्सव! पिंपरी-चिंचवडकरांचा योग, झुम्बा आणि लाईव्ह शोमध्ये तुफान प्रतिसाद
Home पिंपरी चिंचवड अहिल्यादेवींच्या स्मारकाची उपेक्षा! प्रशासनाचा निषेध!

अहिल्यादेवींच्या स्मारकाची उपेक्षा! प्रशासनाचा निषेध!

महापालिकेच्या कार्यक्रमांवर लाखो खर्च, पण स्मारकाकडे दुर्लक्ष; कार्यकर्त्यांनी केले दुग्धाभिषेक.

by maxmanthannews@gmail.com
Spread the love
अहिल्यादेवींच्या स्मारकाची उपेक्षा! प्रशासनाचा निषेध; दुग्धाभिषेक करून आंदोलन. (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी)

पिंपरी, दि. ३० मे २०२५: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने लाखो रुपये खर्चून तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन केले. मात्र, महानगरपालिकेच्या अगदी जवळ असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती स्मारकाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

या निंदनीय कृत्याचा शिवशाही व्यापारी संघ, अखिल भारतीय छावा युवा संघटना आणि बापू बिरू वाटेगावकर धनगर व मातंग समाज महासंघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

राज्य सरकारने अहिल्यादेवींची ३०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे नियोजन केले असताना, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या स्मारकाकडे दुर्लक्ष करणे ही खेदजनक बाब आहे, असे आंदोलकांनी म्हटले.

आंदोलकांनी मागणी केली की, आयुक्तांनी तात्काळ जनसंपर्क विभागाला कारणे दाखवा नोटीस द्यावी आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कारवाई करावी. या मागणीसह आंदोलकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती स्मारकाला दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण केला.

यावेळी शिव वाहतूक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष तथा बापु बिरू वाटेगावकर धनगर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ खरात, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र भाऊ चिंचोळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन अण्णा लिमकर, लहुजी ब्रेगेड संस्थापक अध्यक्ष सतीश दादा भवाळ, माथाडी कामगार नेते आबासाहेब मांढरे, शिवशाही व्यापारी संघ पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, उपनेत्या उषामाई कांबळे, शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड अध्यक्ष शिवाजीराव खडसे, युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे, युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष विक्रम गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजय भाऊ कांबळे, पिंपरी चिंचवड छावा मीडिया अध्यक्ष शुभम बिरादार, रघुनाथ सर मलीशे (ज्येष्ठ शिक्षक), शिवशाही व्यापारी संघाचे महादेव गोंडाळे, सुरज सोनकांबळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!