news
Home मुख्यपृष्ठ ११वा आंतरराष्ट्रीय योग दिवस: मूर्तिजापूर नगर परिषद प्रांगणात हजारो योगसाधकांनी घेतले धडे!

११वा आंतरराष्ट्रीय योग दिवस: मूर्तिजापूर नगर परिषद प्रांगणात हजारो योगसाधकांनी घेतले धडे!

देशाला विश्वगुरु' बनवण्याचा संकल्प; डॉ. स्वाती पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मान्यवरांची उपस्थिती. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मूर्तिजापूरमध्ये ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रचंड उत्साहात संपन्न: ‘एकत्रित योगाभ्यासातून राष्ट्रभक्तीचा संकल्प!’

विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आयोजन; डॉ. स्वाती पोटे यांच्या मार्गदर्शनात हजारो योग साधकांचा उत्स्फूर्त सहभाग!

मूर्तिजापूर,प्रतिनिधी :- विलास सावळे खामगाव २३ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): आरोग्य आणि शांततेचा संदेश देत मूर्तिजापूर शहरात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज (सोमवार, २३ जून) मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. पतंजली योगपीठ हरिद्वार संचलित महिला पतंजली योग समिती मूर्तिजापूर तसेच ओम योग प्रतिष्ठान, अटल फाउंडेशन, ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्था, ओम शांती संघटन, नेहरू युवा मंडळ, गायत्री परिवार, एनर्जेटिक फिटनेस क्लब अशा विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम नगर परिषद मूर्तिजापूरच्या भव्य प्रांगणामध्ये पार पडला.


नेतृत्व आणि मान्यवरांची उपस्थिती

माजी नगराध्यक्षा सौ. मोनालीताई गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला पतंजलीच्या अकोला महिला जिल्हा प्रभारी डॉ. स्वाती पोटे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. पोटे यांच्या पुढाकारानेच हा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस यशस्वीरित्या संपन्न झाला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुजाता मुलमुले, अटल फाउंडेशन जिल्हाध्यक्ष सौ. रूपाली तिडके, ज्ञान नर्मदा संस्था अध्यक्ष सौ. सुनीता विष्णू लोडम, भाजप ज्येष्ठ नेते विनायकजी वारे, कमलाकर भाऊ गावंडे, शहराध्यक्ष हर्षल साबळे, तालुकाध्यक्ष नंदकिशोर राऊत, अभय पांडे, विष्णू लोडम, विलासभाऊ वानखडे, रमेश दर्यानी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘ओम’ ध्वनीच्या सुस्वरात दीप प्रज्वलन करून झाली.


मोठ्या संख्येने योग साधकांचा सहभाग

यावेळी गायत्री परिवाराच्या करुणाताई घुंगशे, ब्रह्मकुमारी परिवाराचे सोपान भाई, प्रवीण भाई, किशोर श्रीराव, सचिन लोहकपुरे, शाम हेंगड, किशोर टाक, जिरापुरे तसेच महिला पतंजली पदाधिकारी सारिका मडके, वर्षा हांडे, वंदना सरोदे, विमल सरोदे, चैताली कावलकर, साधनाताई गावंडे, वर्षा तिडके, अर्चना उंबरकर, उज्वला सवईकर, कविताताई साखरे, मायाताई दवंडे, बांबळताई, वनीता पाथरे व स्थानिक योग साधकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.


राष्ट्रभक्तीचा संकल्प आणि यशस्वी आयोजन

या कार्यक्रमातून देशाला विश्वगुरू बनवण्याकरता देशातील सर्व योग शिक्षकांच्या राष्ट्रभक्तीला, कर्मभक्तीला आणि गुरुभक्तीला त्रिवार वंदन करण्यात आले. उपस्थितांकडून योग कार्याला नेहमीच सहकार्य करण्याचा संकल्प करण्यात आला.

कार्यक्रमाचे बहारदार संचालन समाजसेवक विष्णू लोडम यांनी केले, तर प्रास्ताविक पतंजली जिल्हा प्रभारी डॉ. स्वाती पोटे यांनी केले. मूर्तिजापूर तहसील प्रभारी ज्योतीताई बनसोड यांनी कृतज्ञतापूर्वक उपस्थितांचे आभार मानले. शांती पाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने राजेश भूगुल व समस्त नगर परिषद कर्मचारी, तहसील प्रमुख ज्योतीताई बनसोड, समाजसेवक विष्णू लोडम, कमलाकर गावंडे, कु. विभूती लोडम यांचे विशेष सहकार्य लाभले. या भव्य आयोजनामुळे मूर्तिजापूरमध्ये योगाविषयीची जागरूकता अधिक वाढण्यास मदत झाली आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!