Home पिंपरी चिंचवड प्रफुल्ल पुराणिक यांचा वाढदिवस ‘धूमधडाक्यात’: पिंपरी-चिंचवड मनपाचे ‘अष्टपैलू’ जनता संपर्क अधिकारी!

प्रफुल्ल पुराणिक यांचा वाढदिवस ‘धूमधडाक्यात’: पिंपरी-चिंचवड मनपाचे ‘अष्टपैलू’ जनता संपर्क अधिकारी!

महामानवांच्या जयंती आयोजनाचा हातखंडा; विविध संघटना आणि मान्यवरांकडून भरभरून शुभेच्छा. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड मनपाचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!

 

 

‘महामानवांच्या जयंती ‘ : मनमिळाऊ स्वभावामुळे कार्यकर्ते ते अधिकारी सर्वांचे लाडके; विविध संघटना आणि मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

 

पिंपरी, दि. ३० जून २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जनता संपर्क अधिकारी (PRO) प्रफुल्ल पुराणिक यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि महानगरपालिकेच्या हितासाठी ते करत असलेल्या मेहनतीमुळे त्यांची ओळख एक हुशार आणि कार्यक्षम अधिकारी अशी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, आजी-माजी नगरसेवक, खासदार आणि आमदार यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.


 

काळेवाडीतील जोशी वडेवाले हॉटेलमध्ये जल्लोषात वाढदिवस साजरा!

 

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राज्य अध्यक्ष आणि काळेवाडी येथील प्रख्यात ‘जोशी वडेवाले’ हॉटेलचे मालक, प्रसिद्ध उद्योजक गुरुनाथ यशवंतराव यांनी आपल्या हॉटेलमध्ये जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला. या वेळी बोलताना राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव यांनी सांगितले की, “प्रफुल्ल पुराणिक हे एक साधं सरळ व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत. आलेल्या माणसाचे काम कश्या पद्धतीने केले जाईल, त्याला न्याय कसा मिळेल याची दक्षता ते नेहमी घेतात.” या प्रसंगी मराठा क्रांती स्वराज्य संघटना, पिंपरी-चिंचवडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

‘महामानवांच्या जयंती ‘ : पुराणिक यांची कार्यशैली!

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही महाराष्ट्रातील एकमेव महानगरपालिका आहे, जिथे सर्व महामानवांच्या जयंती अतिशय उत्साहात आणि भव्यदिव्य पद्धतीने साजरा केल्या जातात. या सर्व आयोजनाचे आणि नियोजनाचे संपूर्ण काम हे जनता संपर्क अधिकारी म्हणून प्रफुल्ल पुराणिक यांच्यावर असते. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारल्यापासून अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.

पुराणिक यांच्या नेतृत्वात पिंपरी-चिंचवड शहरात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव, अहिल्यादेवी जयंती महोत्सव, रमाई जयंती महोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले जयंती महोत्सव, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव, छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव तसेच इतर विविध महामानवांच्या जयंती अतिशय उत्साहात साजरा करण्याचा जणू त्यांना हातखंडाच आहे.


 

कार्यकर्ता ते अधिकारी, सर्वांचे प्रिय व्यक्तिमत्व!

 

प्रफुल्ल पुराणिक यांची कार्यशैली अत्यंत प्रभावी आहे. ते सर्वसामान्य जनतेला, नगरसेवकांना आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करतात. त्यांच्याकडून कोणत्याही कार्यकर्त्याचे किंवा नागरिकाचे मन दुखावले जाईल असे काम कधीच होत नाही. म्हणूनच त्यांना दोन्ही विभागातून (प्रशासन आणि जनता) खूप मागणी आहे.

शासन व प्रशासनातून कोणताही अधिकारी आल्यानंतर त्यांच्या सेवेची जबाबदारीही प्रफुल्ल पुराणिक अतिशय उत्कृष्टपणे पार पाडतात. महानगरपालिकेत प्रत्येक काम ते आनंदाने आणि उत्साहाने करतात. काम करत असताना त्यांनी कधीही वेळेचे भान ठेवले नाही, ज्यामुळे ते कार्यकर्ते आणि अधिकारी वर्गात एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्याची हीच खरी पावती आहे.


 

प्रफुल्ल पुराणिक यांचा प्रवास: १९९८ पासून मनपात

 

  • १९९८: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘लिपिक’ म्हणून रुजू.
  • २०२०: ‘मुख्य लिपिक’ पदावर बढती.
  • २०२३: पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘जनता संपर्क अधिकारी’ पदाचा पदभार स्वीकारला.

 

शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित मान्यवर आणि संस्था:

 

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमदार शंकरभाऊ जगताप, विविध माजी नगरसदस्य आणि विद्यमान नगरसदस्या, महानगरपालिकेतील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, सहाय्यक आरोग्याधिकारी, लेखाधिकारी, उपलेखापाल, मुख्य लिपिक, लिपिक यांसह अनेक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

याशिवाय, कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळ, महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती, छावा संघटना, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, खान्देश मित्र मंडळ, संघवी केशरी महाविद्यालयीन मित्र, फत्तेचंद जैन विद्यालयातील १९८६ चे मित्र यांसारख्या अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूर लोकसभा मतदारसंघ निरीक्षक सागरशेठ तापकीर, बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे बंधू सुरेशबाबा पाटणकर, छावा ग्रुपचे अध्यक्ष येळवंडे पाटील, सत्यसिंग पाटणकर गटाचे कोर कमिटी अध्यक्ष किशोर कदम, समाजसेवक कैलास राऊत, पवना हेल्थ क्लबचे विजय पवार, कुंदनशेठ शिंगटे, बँकिंग क्षेत्रातील अभिजीत भुजबळ, मेरी डायरी लेखक नबीलाल मुल्ला, गजेंद्र कांबळे, अल्ताफभाई शेख, संतोष चिकने तसेच मोठ्या प्रमाणात कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

काळेवाडी येथे झालेल्या एका कार्यक्रमास छावा संघटनेचे पदाधिकारी धनाजी येळकर पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते राजन नायर उपस्थित होते. या सर्वांनी प्रफुल्ल पुराणिक यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment