news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पुणे पुण्यात आदिवासी पारधी समाजाच्या जमिनीवर ‘कब्जा’: शिरूर तालुक्यात खाडे कुटुंबीयांवर गंभीर आरोप!

पुण्यात आदिवासी पारधी समाजाच्या जमिनीवर ‘कब्जा’: शिरूर तालुक्यात खाडे कुटुंबीयांवर गंभीर आरोप!

जिवे मारण्याच्या धमक्या, पोलिसांमार्फत दमदाटीचा प्रयत्न; 'आदिवासी पारधी समाज सुरक्षा दला'कडून न्यायासाठी आंदोलनाचा इशारा. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शिरूर टाकळी हाजी येथे आदिवासी पारधी समाजाची जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप!

 

 

होणेवाडी-टाकळी हाजी येथील काळे कुटुंबीयांच्या मालकीच्या जमिनीवर खाडे कुटुंबीयांकडून अतिक्रमण; जातिवाचक शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून दमदाटीचा प्रयत्नही झाल्याचा दावा!

 

पुणे, दि. ४ जुलै २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): शिरूर तालुक्यातील होणेवाडी-टाकळी हाजी येथील गट नंबर ९७८ मधील आदिवासी पारधी समाजातील काळे कुटुंबीयांची मालकी हक्काची वहिवाटीची जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप ‘आदिवासी पारधी समाज सुरक्षा दला’ने केला आहे. गावातील मातब्बर खाडे कुटुंबीयांनी (विकास प्रभाकर खाडे, भरत प्रभाकर खाडे, प्रभाकर सोनबा खाडे, हौसाबाई प्रभाकर खाडे) काळे कुटुंबीय आणि पारधी समाजावर जातिवाचक शिवीगाळ करून, जिवे मारण्याची धमकी देऊन जमिनीवर अतिक्रमण केल्याचे म्हटले आहे.


 

अतिक्रमण आणि धमक्यांचा तपशील:

काळे कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, खाडे कुटुंबीयांनी कॅनॉलच्या बाजूला असलेली त्यांची जमीन बळकावली आहे. या ठिकाणी मातीचे डबर आणून टाकण्यात आले असून, एक नंबरप्लेट नसलेला जेसीबी वापरून बोरीची आणि लिंबाची चार ते पाच झाडे मुळासहित उपटून जमीनदोस्त केली आहेत.

  • जिवे मारण्याची धमकी: ‘भालचंद्र भिवा काळे’ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देऊन जमिनीवर कब्जा करण्यात आल्याचा आरोप आहे.
  • पोलिसांमार्फत दमदाटीचा प्रयत्न: काळे कुटुंबीय अशिक्षित असल्याने, त्यांच्यावर अन्याय-अत्याचार करूनही, खाडे कुटुंबीयांनी आधीच संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन काळे कुटुंबीयांना पोलिसांमार्फत दमदाटी करण्याचा प्रयत्नही केल्याचा दावा करण्यात आला आहे.
  • मुजोरपणा आणि शिवीगाळ: घटनास्थळी पाहणी केली असता, “काळे कुटुंबीय इथे दिसले तर तुमचे हातपाय तोडले जातील, तुमचं काय असेल ते कॅनलच्या खाली बघायचं, वरती आले तर तुम्हाला जिवे मारायला सुद्धा आम्ही पुढे मागे बघणार नाही हे लक्षात घ्या,” अशा धमक्या देण्यात आल्या. भरत प्रभाकर खाडे यांनी “मी वकील आहे, माझे काही वाकडे होत नाही, काय करायचं ते करून घ्या,” अशी धमकी देऊन महिलांसहित अंगावर धावून येत मुजोरपणा दाखवल्याचेही काळे कुटुंबीयांनी सांगितले आहे.

 

पत्रकारांसमोरही धमक्यांचा प्रकार:

काही पत्रकार बांधव या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग आणि काळे कुटुंबीयांची बाजू घेण्यासाठी गेले असताना, सायंकाळच्या सुमारास सुमारे ६.४५ वाजता खाडे यांचा ट्रॅक्टर शेतीचे काम उरकून निघाला. त्यावेळी काळे कुटुंबीय आणि काही सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित होते. त्यांना बघताच खाडे ट्रॅक्टर थांबवून खाली उतरले आणि काळे कुटुंबीयांतील सदस्यांना शिवीगाळ करण्याच्या किंवा मारहाण करण्याच्या तयारीने पुढे सरसावले. मात्र, त्यांच्या पत्नी हौसाबाई खाडे यांनी त्यांना आवरले आणि “आता सध्या त्यांची लोक या ठिकाणी आलेली आहेत, आता आपण यांना नंतर बघू, आता घरी चला आपले पोरं आल्यावर त्यांच्याकडे आपण उद्या बघू, आता करू द्या यांना काय करायचे कोणाला बोलायचे बोलू द्या,” असे बोलून त्यांनी तिथून ट्रॅक्टर निघून गेला.

हा सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्ते किसन भोसले आणि बी.के. भालेराव यांनी स्वतः पाहिल्याचे सांगितले.


 

प्रशासनाकडे तक्रार, न्याय न मिळाल्यास आंदोलन:

 

दुसऱ्या दिवशी भालचंद्र काळे वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर यांच्याकडे तक्रार करण्यास गेले असता, खाडे यांचा मुलगा त्यांच्या जाण्याआधीच तिथे उपस्थित होता. यानंतर भालचंद्र काळे यांनी उपनिरीक्षक भूमी अभिलेख यांनाही निवेदन दिले आहे.

‘आदिवासी पारधी समाज सुरक्षा दला’ने इशारा दिला आहे की, जर संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर आणि भूमी अभिलेख उपनिरीक्षक यांनी याविषयी काही कारवाई केली नाही, तर न्याय मिळेपर्यंत जोरदार आंदोलन करण्यात येईल. या प्रकरणामुळे आदिवासी पारधी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात पुन्हा एकदा आवाज उठवला गेला आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!