news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home अकोला शिवशाही बसमधील महिलेला अकोल्यात जबरदस्तीने उतरवले: कंडक्टरवर गंभीर आरोप, प्रवाशांमध्ये संताप!

शिवशाही बसमधील महिलेला अकोल्यात जबरदस्तीने उतरवले: कंडक्टरवर गंभीर आरोप, प्रवाशांमध्ये संताप!

मूर्तिजापूरजवळ घडली संतापजनक घटना; 'महिला सन्माना'च्या सरकारी धोरणाला महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरताळ. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अमरावती-बुलढाणा शिवशाही बसमधून महिलेला मुर्तीजापूरजवळ मध्येच उतरवले; कंडक्टरवर गैरवर्तनाचा आरोप, कारवाईची मागणी!

 

 

आषाढी एकादशीच्या गर्दीचा गैरफायदा? ‘सरकार बहिणींचा सन्मान करते, कर्मचारी मात्र अपमानास्पद वागतात!’

 

मुर्तीजापूर, प्रतिनिधी : विलास सावळे
दि. ०५ जुलै २०२५:
अमरावतीहून बुलढाणा जाणाऱ्या शिवशाही बसमधून (क्र. एम. एच. ०६ बी. डब्ल्यू. १२३३) एका महिला प्रवाशाला, निवेदिका शिवकन्या शिवानी किशोर श्रीराव यांना, मुर्तीजापूरजवळ बनोरा येथे मध्येच उतरवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बस कंडक्टर ए. एल. शेख यांनी तिकीट न देताच महिलेला उतरवून दिल्याचे आणि त्यांच्याशी उद्धटपणे बोलल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधित कंडक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.


 

घडलेली घटना आणि महिला प्रवाशाचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीहून निघालेली ही शिवशाही बस (ज्याचे मुर्तीजापूर, अकोला, खामगाव येथे थांबे होते), तिची प्लेट वाचून  निवेदिका शिवकन्या शिवानी किशोर श्रीराव या बसमध्ये बसल्या. मात्र, बस कंडक्टर ए. एल. शेख यांनी त्यांना तिकीट दिले नाही. मुर्तीजापूर येथे जात असताना, कंडक्टरने त्यांना बनोरा येथेच उतरवून दिले.

यावर महिलेने “मला का उतरवून दिले?” असे विचारले असता, कंडक्टरने “आम्ही मुर्तीजापूर स्टॉप घेत नाही आणि तुम्हाला इथेच उतरवून देतो,” असे उद्धटपणे उत्तर दिल्याचे शिवकन्या यांनी सांगितले. “एकीकडे सरकार लाडक्या बहिणींसाठी महिलांचा आदर सन्मान करतेय, तर दुसरीकडे महामंडळाचे कर्मचारी ए. एल. शेख नेहमीच महिलांसोबत उद्धट भाषेत बोलतात. ही महिला रोज बसने प्रवास करते,” असा गंभीर आरोप शिवकन्या यांनी केला आहे.


 

आषाढी एकादशीची गर्दी आणि बसची समस्या

 

आषाढी एकादशी असल्याकारणाने बसेसची संख्या कमी होती, त्यामुळे मिळेल त्या बसने प्रवास करण्याची प्रवाशांची धडपड सुरू होती. याच परिस्थितीत, बसमध्ये एकच सीट उपलब्ध असल्यामुळे कंडक्टरने मुर्तीजापूरला थांबा नसल्याचे कारण देत महिलेला मध्येच उतरवून दिल्याचे सांगितले जात आहे.


कारवाईची जोरदार मागणी

 

या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून, कंडक्टर ए. एल. शेख यांच्यावर तातडीने कारवाई झालीच पाहिजे, अशी शिवकन्या शिवानी किशोर श्रीवास आणि इतर महिला प्रवाशांची मागणी आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांना अशाप्रकारे अपमानास्पद वागणूक देणे गंभीर असून, यावर प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!