news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये ‘डीपी’वरून रणकंदन: ‘घरावर डीपी तर मढ्यावरून’ – कोळसे पाटील यांचा सरकारला थेट इशारा!

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘डीपी’वरून रणकंदन: ‘घरावर डीपी तर मढ्यावरून’ – कोळसे पाटील यांचा सरकारला थेट इशारा!

थेरगावातील 'स्वाभिमानी घर बचाव' आंदोलनाला न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांचे बळ; "उपोषण नव्हे, लोकलढा उभारा" असे आवाहन, प्रॉपर्टी कार्ड मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आमच्या मढ्यावरूनच डीपी होईल – कोळसे पाटील: पिंपरी-चिंचवडच्या रहिवाशांचा ‘डीपी’ला तीव्र विरोध!

थेरगाव येथे ‘स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळी’चे उपोषण; माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांचे मार्गदर्शन, ‘मनगटाच्या जोरावर प्रश्न सोडवा’ असे आवाहन!

पिंपरी-चिंचवड, दि. २३ जुलै २०२५: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन प्रारूप विकास आराखड्याला (DP) तीव्र विरोध दर्शवण्यासाठी थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवडे नगर, बिजलीनगर, रहाटणी येथील रहिवाशांनी ‘स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळी’च्या वतीने १६ जुलैपासून थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालयात घराचा सत्याग्रह आणि साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला मंगळवार, २२ जुलै रोजी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.

कोळसे पाटील यांचे आक्रमक आवाहन:

कोळसे पाटील यांनी उपोषणकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “हे सरकार उपोषणाची दखल घेणारे नाही, या सरकारला मनगटाची भाषा समजते. त्यासाठी उपोषण स्थगित करून मोठा लोकलढा उभारून आपल्या मनगटाच्या जोरावर आपला प्रश्न सोडवला पाहिजे. हे भांडवलदारांचे, बिल्डर धार्जिने सरकार आहे.” त्यामुळे त्यांनी उपोषणकर्ते धनाजी येळकर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना साखळी उपोषण स्थगित करण्याचे आवाहन केले.

कोळसे पाटील पुढे म्हणाले, “या घरावर टाकलेल्या डीपीच्या विरोधात महिलांचा मोठा पुढाकार हवा, मोठे आंदोलन उभे करा. मी तुमच्यासाठी मारायला तयार आहे. आणि शपथ घ्या हा डीपी होईल तर आमच्या मढ्यावरून आणि प्रत्येकाने पुढे येऊन लढायला सुरुवात करा तेव्हाच घरांवर टाकलेला हा रिंग रोड आणि रस्ते थांबतील. सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका.”

चळवळीचा पुढील टप्पा आणि प्रशासनाला इशारा:

मुख्य समन्वयक धनाजी येळकर पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आज साखळी उपोषण स्थगित जरी करीत असलो तरी हा लढा प्रॉपर्टी कार्ड मिळाल्याशिवाय थांबणार नाही. त्यामुळे ३५ ते ४० वर्ष प्रलंबित असलेल्या या गंभीर प्रश्नाचे राजकारण करत कायम फसवणूक करणाऱ्या येथील लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन, आणि राज्यसरकार यांच्या विरोधात आजपासून निषेध म्हणून प्रश्न मार्गी लागेपर्यंत घरावर काळे झेंडे लावू.” त्यांनी समन्वय साधून येत्या १५ ऑगस्टपर्यंत प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन केले, अन्यथा १६ ऑगस्टपासून यांच्या विरोधात ‘चले जाव’ चळवळ उभी करून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांवर बहिष्कार टाकू, असा इशाराही दिला.

उपस्थित मान्यवर आणि नागरिक:

यावेळी समन्वयक शिवाजी इबीतदार, मनोज पाटील, देवेंद्र भदाणे, गौरव धनवे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, ज्ञानेश्वर मलशेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) राहुल कलाटे, प्रवक्ते माधव पाटील धनवे, शिवसेना (उ.बा. ठा.) गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, हरेश नखाते, संदीप भालके, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, प्रवीण कदम, राजू पवार, प्रमोद शिंदे, विशाल बारणे, रामचंद्र ढेकळे, किशोर पाटील, बालाजी ढगे, कुणाल महाजन, राजश्री शिरवळकर, अर्चना मेंगडे, पल्लवी साळुंखे, यशोदा पवार, फरिदा कुरणे, प्रतिभा कांबळे, अश्विनी पाटील, सुरेखा बहिरट, चंद्रकला नवाडे, नीलम सांडभोर, छावाचे प्रदेशाध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष राजन नायर, सचिन भिसे, व्यापारी संघटनेचे अंगद जाधव, मारुती निंबाळकर, नयना नारखेडे, कल्पना निंबाळकर, नकुल भोईर, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!