news
पिंपरीतील ‘श्रीटिकेल’ कंपनीच्या २७५ कामगारांनी केले रक्तदान; ‘वायसीएम’ मधील गरीब रुग्णांना मिळणार जीवनदान!पिंपरी-चिंचवडमधील १३४ मनपा शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी घुमला ‘ओंकार’ नाद! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभागपिंपरी-चिंचवड मनपा आणि योग विद्या धामच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ संकल्पनेवर भव्य योग सोहळा!रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त
Home पिंपरी चिंचवड पिंपळे सौदागरमध्ये पुन्हा एकदा रक्ताचे डाग: अवजड वाहनांचा हैदोस, डंपरने घेतला वयोवृद्धाचा जीव!

पिंपळे सौदागरमध्ये पुन्हा एकदा रक्ताचे डाग: अवजड वाहनांचा हैदोस, डंपरने घेतला वयोवृद्धाचा जीव!

६ महिन्यांतील दुसरी घटना, बांधकाम व्यावसायिकांना वेळेचे बंधन घालण्याची मागणी; वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिक आक्रमक. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपळे सौदागरमध्ये पुन्हा अपघात: डंपरखाली चिरडून दुचाकीस्वार पंडीत समर्थ वय ६५ वयोवृद्धाचा चा मृत्यू

स्मार्ट सिटीमध्ये ‘ट्रॅफिक’चा बळी, नागरिक संतप्त

पिंपरी-चिंचवड: पिंपळे सौदागर येथील पी.के. चौकामध्ये एका दुचाकीस्वार श्री.पंडीत समर्थ वय ६५ राहणार बिजली नगर या वयोवृद्धाचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या सहा महिन्यांमधील अशा प्रकारची ही दुसरी घटना असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने २०१७ मध्ये या परिसराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश केला असला तरी, येथील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

अनियंत्रित बांधकाम वाहतूक आणि प्रशासनाचे दुर्लक्ष

पिंपळे सौदागर भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे डंपर, सिमेंट मिक्सर, स्टील, आणि पाण्याचे टँकर अशा अवजड वाहनांची सर्रासपणे ये-जा चालू असते. विशेषतः आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या कामाच्या वेळेतही ही वाहतूक सुरू असते, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी होते आणि अपघातांचा धोका वाढतो.

यापूर्वी सहा महिन्यांपूर्वी याच परिसरात, कोकणे चौकाजवळ एका महिलेचा डंपरखाली येऊन मृत्यू झाला होता. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी वाहतूक पोलिसांना तक्रार करूनही त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

स्थानिक नागरिकांची मागणी: बांधकाम व्यावसायिकांना वेळेचे बंधन घाला

स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त निधी लाटला जात आहे, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिक आता आक्रमक झाले असून, त्यांनी प्रशासनाकडे तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नागरिकांची मुख्य मागणी अशी आहे की, बांधकाम व्यावसायिकांच्या अवजड वाहनांना ठराविक वेळेतच वाहतूक करण्याची परवानगी द्यावी. यासंबंधी योग्य ते नियोजन करून वाहतुकीवर नियंत्रण ठेवल्यास अशा दुर्दैवी घटना टाळता येतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!