news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडच्या कुदळवाडी शाळेत शिक्षणाची नवी पहाट!

पिंपरी-चिंचवडच्या कुदळवाडी शाळेत शिक्षणाची नवी पहाट!

‘प्रिझम सॉफ्टवेअर’मुळे कामात पारदर्शकता; प्रशासनाचे कौतुक, लोकसहभागातून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कुदळवाडी शाळा आता ‘टेक्नोसेव्ही’; डिजिटल उपक्रमांमुळे बनली आदर्श! 

‘प्रिझम सॉफ्टवेअर डिस्प्ले बोर्ड’चे उद्घाटन; प्रशासनाचे कौतुक, लोकसहभागातून मोठा बदल

पिंपरी, मॅक्स मंथन डेली न्यूज,दि. ७ ऑगस्ट २०२५: पिंपरी चिंचवड शहरात प्रशासन आणि लोकसहभागातून शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे बदल घडत आहेत. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे कुदळवाडी येथील महापालिकेची शाळा होय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या शाळेने आता ‘टेक्नोसेव्ही’ शाळा म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शाळेला डिजिटल बनवण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी केले.

‘प्रिझम सॉफ्टवेअर डिस्प्ले बोर्ड’चे उद्घाटन

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पब्लिक स्कूल, कुदळवाडी क्र. ८९ या डिजिटल शाळेमध्ये ‘प्रिझम सॉफ्टवेअर डिस्प्ले बोर्ड’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला प्रशासन अधिकारी संगीता बांगर, पर्यवेक्षिका आशा निगडे, प्रमिला होले, मुख्य समन्वयक मंदाकिनी गोसावी, दिनेश यादव, माजी महापौर राहुल जाधव, संभाजी बालघरे, युवराज पवार, सुनील यादव यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि पारदर्शकता

सहाय्यक आयुक्त मोरे यांनी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचे कौतुक करताना सांगितले की, कुदळवाडी शाळेने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अनेक कामांमध्ये पारदर्शकता आणली आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी, बोनाफाईड दाखला, गुणपत्रिका, प्रवेश फॉर्म, शाळेतील उपक्रमांची नोंद आणि ग्रंथालयातील पुस्तकांची नोंद यांसारखी कामे यशस्वीरित्या राबवली जात आहेत.

विशेष म्हणजे, शाळेतील बालवाडीतील ११८ आणि इयत्ता पहिली ते आठवीचे ९७० विद्यार्थी यांची दैनंदिन हजेरी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे घेतली जात आहे. मान्यवरांनी यावेळी क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची थेट प्रात्यक्षिक चाचणीही केली. या सॉफ्टवेअरमुळे प्रवेश प्रक्रियेत सुलभता, पारदर्शकता आणि आधुनिक डिजिटल अनुभव मिळणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!