news
Home सातारा ‘शोषित-वंचितांचा’ आवाज आता राजकारणात; ‘ऑल इंडिया पँथर सेने’ची नवी राजकीय दिशा!

‘शोषित-वंचितांचा’ आवाज आता राजकारणात; ‘ऑल इंडिया पँथर सेने’ची नवी राजकीय दिशा!

साताऱ्यातील बैठकीत निवडणुकांची रणनीती ठरली, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी पुणे शहराची निवड. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आगामी निवडणुकांसाठी ‘ऑल इंडिया पँथर सेना’ सज्ज: साताऱ्यात रणनीतीवर चर्चा!

 

 

सामाजिक आंदोलनातून राजकीय प्रवासाकडे वाटचाल, लवकरच पुण्यात भव्य मेळाव्याचे आयोजन

 

२० ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

 


महाराष्ट्र :
राज्याच्या राजकारणात आपले स्थान निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘ऑल इंडिया पँथर सेना’ आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी सज्ज झाली आहे. संघटनेच्या महाराष्ट्र कोर कमिटीची बैठक नुकतीच साताऱ्यातील विश्रामगृह येथे पार पडली, सदर बैठक ही राष्ट्रीय अध्यक्ष भाई दीपक केदार यांच्या नेतृत्वात घेण्यात आली.ज्यात निवडणुकीच्या तयारीवर सविस्तर रणनीती आखण्यात आली. या बैठकीत लवकरच पुण्यात राज्यव्यापी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

 

मूळतः सामाजिक आंदोलनातून उदयास आलेली पँथर सेना आता शोषित, वंचित आणि सर्वसामान्य लोकांचा आवाज बनून राजकीय प्रवासाकडे ठामपणे वाटचाल करत आहे. निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या पुढे येत आहे. संघटना या सर्व इच्छुकांना योग्य दिशा देण्यासाठी आणि संस्थात्मक पाठबळ देण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.

 

या महत्त्वपूर्ण बैठकीला महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, सरचिटणीस जितेश भाई जगताप, प्रदेश प्रवक्ता आणि बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, विदर्भ अध्यक्ष दादाराव ढोले आणि कोऑर्डिनेटर अविनाश हिवाळे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!