news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड ‘समता आणि मानवतेचा’ संदेश देणाऱ्या श्री चक्रधरस्वामी यांना आदराने स्मरण

‘समता आणि मानवतेचा’ संदेश देणाऱ्या श्री चक्रधरस्वामी यांना आदराने स्मरण

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त अभिवादन; साधेपणा आणि भक्तीचा वारसा जपण्याचे आवाहन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

समाजसुधारक श्री चक्रधरस्वामी यांना महापालिकेतर्फे अभिवादन

 

 

जयंतीनिमित्त अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी वाहिली आदरांजली

 

२५ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी, पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे – महान समाजसुधारक श्री चक्रधरस्वामी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे आदराने अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये श्री चक्रधरस्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.


 

साधेपणा, समता आणि मानवतेचा संदेश

 

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी श्री चक्रधरस्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या संत जीवनातून श्री चक्रधरस्वामींनी साधेपणा, अध्यात्म आणि भक्तीचा संदेश दिला. त्यांनी समाजात समता व मानवतेची शिकवण दिली. त्यांचे हे विचार आजही तितकेच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत. अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचे स्मरण करून त्यांचे विचार समाजामध्ये रुजविणे महत्त्वाचे आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!