प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकतींची सुनावणी १० सप्टेंबरला
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जाहीर आवाहन; हरकतींच्या सुनावणीसाठी नागरिकांनी वेळेवर हजर राहावे
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, ०८ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांची सुनावणी बुधवार, १० सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. महाराष्ट्र शासनाचे वतीने यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून श्री. प्रवीण दराडे (भा.प्र.से., प्रधान सचिव, सहकार व पणन विभाग, मंत्रालय, मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्या नागरिकांनी प्रारुप प्रभाग रचनेसंदर्भात हरकती व सूचना दाखल केल्या आहेत, त्या सर्वांनी सुनावणीसाठी निश्चित केलेल्या वेळेनुसार उपस्थित राहणे आवश्यक आहे.
सुनावणीचे स्थळ आणि वेळापत्रक
सुनावणीचे ठिकाण खालीलप्रमाणे आहे: स्थळ: ऑटो कूस्टर डेव्हलपमेंट लि., एच.ब्लॉक, सी-१८१, डी मार्टच्या मागे, चिंचवड, पुणे ४११ ०१९
नागरिकांनी त्यांच्या हरकत क्रमांकानुसार आणि वेळेनुसार उपस्थित राहावे. सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
वेळ: दुपारी १:०० वाजता
- हरकत क्रमांक: १, २, ३, ४, ६, ७, ८, १०, ११
- प्रभाग क्रमांक: २५, २६, २७, २८, २९, ३०, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ३६, ३७, ३८, ३९, ७०, ७१, ७२, ७३, ७४, ७५, ७६, ७७, ७८, ७९, ८०, ८१, ८२, ८३, ८४, ८५, ८७, ८८, ८९, ९१, ९२, ९३, ९४, ९५, ९६, १०५, १०६, १०७, १०८, १०९, ११०, १११, ११२, ११३, ११४, ११५, ११६, ११७, ११८, ११९, १२०, १२१, १२२, १२३, १२४, १२५, १२६, १२७, १२८, १२९, १३०, १३१, १३२, १३३, १३४, १३५, १३६, १३७, १३८, १३९, १४०, १४१, १४२, १४३, १४४, १४५, १४६, १४७, १४८, १४९, १५०, ३०२, ३०३, ३०४, ३०५, ३०६, ३०७, ३०८, ३०९, ३१०, ३११, ३१२, ३१३
वेळ: दुपारी २:०० वाजता
- हरकत क्रमांक: २, ३, ४, ६, ७, ८, ९, १०, १२, १३, १५, १६, १७
- प्रभाग क्रमांक: २९८, २७३, २७४, २७५, २७६, २७७, २७८, ४, १८, ४३, ८६, १९४, २७९, २८०, २८१, २८२, २८३, २८४, २८५, २८६, २८७, २८८, २८९, २९०, २९१, २९२, २९३, १, ४६, ४८, ४९, ५०, ५१, ५२, ५३, ५४, ५५, ५६, ५७, ५८, ५९, ६१, ६२, ६३, ६४, ६५, ६६, ६७, ६८, ६९, ८६, ९०, ९७, ९८, ९९, १०१, ३१९, ३२०, ३२१, ३२२, १९३, हरकती
वेळ: दुपारी ३:०० वाजता
- हरकत क्रमांक: ९, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १८, १९, २०
- प्रभाग क्रमांक: ४४, १०९, १९०, २१५, २१६, २१७, २१८, २१९, २२०, ४०, ४१, १५१, १५२, १५३, १५४, १५५, १५६, १५७, १५८, १५९, १६०, १६१, १६२, १६३, १६४, १६५, १६६, १६७, १६८, १६९, १७०, १७१, १७२, १७३, १७४, १७५, १७६, १७७, १७८, १७९, १८०, १८१, १८२, १८३, १८४, १८५, १८६, १८७, १८८, १९५, १९६, १९७, १९८, १९९, २००, २०१, २०२, २०३, २०४, २०५, २०६, २०७, २०८, २०९, २१०, २११, २१२, २१३, २१४, २२१, २२२, २२३, २२४, २२५, २२६, २२७, २२८, २२९, २३०, २३१, २३२, २३३, २३४, २३५, २३६, २३७, २३८, २३९, २४०, २४१, २४२, २४३, २४४, २४५, २४६, २४७, २४८, २४९, २५०, २५१, २५२, २५३, २५४, २५५, २५६, २५७, २५८, २५९, २६०, २६१, २६२, २६३, २६४, २६५, २६६, २६७, २६८, २६९, २७०, २७१, २७२, १००
वेळ: दुपारी ४:०० वाजता
- हरकत क्रमांक: २१, २२, २३, २४, २५, २६, २७, २८, २९, ३०, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ३६, ३७
- प्रभाग क्रमांक: ४५, २, २२, ४७, २९४, २९५, २९६, २९७, १०२, १०३, १०४, २९९, ६, ३००, ३०१, ३१६, ३१७, १९१, १९२, ३१४, ३१५, ३१८, ३, ५, ४२ (संपूर्ण प्रभाग रचनेवर)
सुनावणीसाठी आवश्यक कागदपत्रे
सुनावणीला येणाऱ्या नागरिकांना खालील कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे:
- हरकत अर्ज दाखल केल्याची पोहोच.
- सुनावणी नोटीसची प्रत.
- ओळखपत्रासह स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
