अमरावती
विद्यार्थ्यांनी ग्रंथांसह डिजिटल ई-संसाधनांचा वापर करून ज्ञानाचा विस्तार करावा; डॉ. कमलाकर पायस यांचे आवाहन
तक्षशिला महाविद्यालयात पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त ‘ओरिएंटेशन कार्यक्रम’ उत्साहात संपन्न!
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. १३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
“विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता ग्रंथालयातील उपलब्ध पुस्तके, संदर्भग्रंथ, डिजिटल व ई-संसाधनांचा नियमित वापर करावा. डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राला दिलेले योगदान आजही आपल्याला दिशा देणारे आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी वाचन आणि संशोधनवृत्ती वाढवून ज्ञानाधिष्ठित समाज निर्मितीत योगदान द्यावे.”
व्यसनमुक्ती प्रबोधन प्रदर्शन आणि महा. अनिसच्या पंचसूत्रीच्या मांडणीतून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अंधश्रद्धा निर्मूलनविषयक विचारांना उजाळा; महाराष्ट्र अनिसचा ३७ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न!
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ११ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

दि. १६ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या कार्यशाळेत प्रशिक्षणार्थींना मिळाले नाट्यनिर्मिती आणि कॅमेऱ्यासमोरील अभिनयाचे धडे
अमरावतीत ‘अभिव्यक्ती’ अभिनय व नाट्यनिर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न! ‘बीइंग आर्टिस्ट अकॅडमी’चा स्तुत्य उपक्रम
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ९ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
“नाटक हे केवळ अभिव्यक्ती किंवा लोकरंजनाचे माध्यम नसून ते व्यक्तीच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे अत्यंत प्रभावी साधन आहे.”
बोर्डी येथील ‘श्री संत गजानन महाराज वृद्ध सेवाश्रमात’ तेजांकुर बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम
आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून निराश्रित अनुसयाबाई गोरडे यांना व्हिलचेअर प्रदान!
परतवाडा/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ९ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
वाढत्या राजकीय आणि सामाजिक ध्रुवीकरणाच्या काळात तत्त्वनिष्ठता, विवेक आणि संविधानिक मूल्यांवर भाष्य करणारा वैचारिक लेख
मतवादी क्या जाने, तत्ववादी की बात; सूरज डूबा, उल्लू कहे हुआ सवेरा!
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
टीप: या लेखाचा उद्देश कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेवर टीका करणे नसून, समाजातील वाढत्या “मीच बरोबर” या मानसिकतेवर चिंतन करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. वैचारिक मतभेद हे विवेक आणि संवादाच्या चौकटीत राहिले तरच लोकशाही सुदृढ राहील.— प्रफुल्ल मंदा श्रीधर
परदेशातील प्रगत शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यासासाठी ‘फार्मर आयडी’धारक शेतकऱ्यांना मिळणार संधी
अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरोप आणि चीन अभ्यासदौऱ्याची सुवर्णसंधी; २० ऑगस्टपर्यंत अर्जाचे आवाहन!
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: कृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यांचे आयोजन राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना युरोप आणि चीन या देशांतील शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार असून, इच्छुक शेतकऱ्यांनी २० ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात होत असलेले आधुनिक बदल, नवनवीन संशोधन आणि विकसित होणारे प्रगत तंत्रज्ञान आपल्या राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
परदेशातील नामांकित कृषी शास्त्रज्ञ व स्थानिक शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याची संधी. परदेशातील कृषी संशोधन संस्था, प्रगत तंत्रज्ञानावर आधारित शेती आणि प्रक्रिया उद्योगांची प्रत्यक्ष पाहणी. परदेशी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेतीतील उत्पादन खर्च कमी कसा करावा व उत्पन्न कसे वाढवावे, याचे प्रात्यक्षिक ज्ञान.
अर्जदार व्यक्ती स्वतः शेतकरी असावी आणि शेती हेच त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन असावे (याबाबतचे स्वयंघोषणापत्र जोडणे अनिवार्य).अर्जदाराकडे ॲग्रीस्टॅक (AgriStack) अंतर्गत ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) असणे आवश्यक आहे. सहलीच्या दिवशी शेतकऱ्याचे वय किमान २५ वर्षे पूर्ण असावे आणि त्यांच्याकडे वैध पासपोर्ट (Passport) असणे आवश्यक आहे. एका शेतकरी कुटुंबामधून केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. शेतकरी कोणत्याही शासकीय, निमशासकीय, सहकारी अथवा खाजगी संस्थेत नोकरीला नसावा. अर्जासोबत वैध ओळखपत्राची प्रत जोडणे बंधनकारक आहे.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्ज प्रक्रियेसाठी अमरावती जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश; अभ्यासासोबतच सामाजिक व शैक्षणिक चळवळींत बजावली सक्रिय भूमिका
दिल्ली विश्वविद्यालयातून एलएलबी पदवी संपादन; अमरावतीच्या वैभव अभ्यंकर यांचा प्रेरणादायी ‘गल्ली ते दिल्ली’ यशप्रवास!
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: अमरावती येथील राहुलनगरचे रहिवासी वैभव अभ्यंकर यांनी भारतातील सर्वोच्च व नामांकित दिल्ली विद्यापीठातून (Delhi University) सन २०२३ ते २०२६ या कालावधीत एलएलबीची (LLB – विधी पदवी) परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण करून पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल संपूर्ण अमरावती शहरासह सामाजिक व शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, मर्यादित संसाधने आणि विविध कौटुंबिक व सामाजिक आव्हानांचा सामना करत वैभव अभ्यंकर यांनी जिद्द, चिकाटी आणि अढळ आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. त्यांचा हा ‘गल्ली ते दिल्ली’ असा खडतर व प्रेरणादायी प्रवास उच्च शिक्षणाची स्वप्ने पाहणाऱ्या अनेक ग्रामीण व शहरी तरुणांसाठी अत्यंत मार्गदर्शक आणि आदर्श ठरत आहे.
दिल्लीमध्ये कायदा आणि न्यायव्यवस्थेचे शिक्षण घेत असताना त्यांनी केवळ पुस्तकी अभ्यासापुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या जागरूक, अभ्यासू आणि समाजाभिमुख विद्यार्थ्याची भूमिका बजावत त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर उठलेल्या आंदोलनांमध्ये तसेच सामाजिक-शैक्षणिक चळवळींमध्ये हिरिरीने व सक्रिय सहभाग नोंदवला.
वैभव यांच्या या यशाबद्दल त्यांच्या आजी गोकर्णबाई वकीलराव अभ्यंकर, जिजा वसंतराव तसरे, वडील दादा अभ्यंकर, बाबाराव अभ्यंकर, आई वंदना दादा अभ्यंकर आणि वीणा अभ्यंकर यांनी त्यांचे विशेष कौतुक करून त्यांना पुढील उज्वल भविष्यासाठी उदंड शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच परिसरातील नामांकित आणि वरिष्ठ नागरिक इंजि. सुशील गुडदे, इंजि. संजय ढवळे, नितीन आठवले (फार्मासिस्ट), इंजि. अनिल बागडे, पोलीस निरीक्षक राहुल तसरे, पोलीस निरीक्षक अतुल इंगोले, प्रा. अरुणा तसरे (राऊत), विजय दांडगे सर, सतीश दादा गवई, कलेश कांबळे, राजेंद्र गवई, सिद्धार्थ गुडदे, विजय वानखडे, मोहन इंगळे, रुपेश सरदार, देवेन ढोके, अमोल अडेकार, विजय लव्हाळे, सचिन बनसोड, सागर वानखडे, चेतन अभ्यंकर यांच्यासह मानवता बुद्ध विहार आणि राहुलनगर परिसरातील नागरिकांनी वैभव अभ्यंकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. वैभव अभ्यंकर यांचे हे यश अमरावती जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असून त्यांच्या या यशोगाथेमुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आणि कायद्याच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी नवी दिशा व प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन शैक्षणिक वाटचाल करण्याचे निलेशभाऊ खडसे यांचे आवाहन
लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा आदर्श घेऊन मातंग समाजाने शैक्षणिक प्रगती करावी: ॲड. राजूभाऊ कलाने
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: जगविख्यात साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती ही केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही अत्यंत आदराने व उत्साहात साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर जुनी वस्ती, बडनेरा येथे मातंग समाजातील जागरूक युवकांच्या पुढाकाराने प्रथमच लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून युवा सामाजिक कार्यकर्ते ॲड. राजूभाऊ कलाने उपस्थित होते. तर विशेष निमंत्रक पाहुणे म्हणून मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष निलेशभाऊ खडसे, ॲड. शुभम खजोने आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते साहेबराव लोखंडे प्रमुख उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात बोलताना ॲड. राजूभाऊ कलाने यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले:
“लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लोकनाट्य, पोवाडे आणि विविध कादंबऱ्यांच्या माध्यमातून दलित, पीडित व कष्टकरी कामगारांच्या व्यथा मांडल्या. मातंग समाज बांधवांनी अण्णाभाऊंच्या संघर्षाचा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शैक्षणिक प्रगतीकडे वाटचाल केली पाहिजे.”
विशेष निमंत्रक पाहुणे निलेशभाऊ खडसे यांनी मातंग समाजाला मुक्ता साळवे यांचा शैक्षणिक वारसा पुढे नेण्याचे आणि शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी सुनील भोकरे, मंगल इंगोले, संदीप भोकरे, अंकुश भोकरे, सुरेश भोकरे, अर्जुन इंगोले, करण इंगोले, अमोल भोकरे, लड्डूजी खंडारे, देविदास भोकरे, रघुनाथ भोकरे, मारोतराव भोकरे, राजेश भोकरे, मंगेश भोकरे, किरण भोकरे, ऋषिकेश भोकरे, अजय भोकरे, संतोष भोकरे, योगेश चांदणे, रोहित भोकरे, शैलेश भोकरे, प्रेम भोकरे, कार्तिक भोकरे, योगीराज भोकरे, आदित्य थोरात, वेदांत इंगोले, मंगेश भोकरे, महेंद्र खडसे, जय मोरे, महेश इंगोले, प्रसेनजित प्रधान हे प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच महिला मंडळातून प्रतिभा भोकरे, मालू उर्फ बाली इंगोले, वंदना इंगोले, प्रेमीला रमेश भोकरे, प्रेमीला सुनील भोकरे, अरुणा भोकरे, रिता भोकरे, सारिका भोकरे, कोमल खडसे, संध्या भोकरे, लक्ष्मी खडसे, पंचांबाई भोकरे, ललिता बाई भोकरे, मीना बाई भोकरे, मीना भोकरे, शोभा बाई भोकरे, सुरेखा बाजड, दर्शना भोकरे, नंदा बाई लोखंडे, वेदिका लोखंडे, सुमनबाई खडसे, विद्याबाई मोरे, प्रतीक्षा मोरे, अश्विनी इंगोले व छकुली प्रधान आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या जयंती उत्सव कार्यक्रमाचे नेटके आयोजन अर्जुन इंगोले, अमोल भोकरे, कैलास भोकरे, महादेव इंगोले व करण इंगोले यांनी केले असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टमध्ये पार पडला जयंती सोहळा; ९ ऑगस्टला ‘तुकडोजी महाराज अन् अंधश्रद्धा निर्मूलन’ परिसंवाद
अण्णाभाऊ म्हणजे सामाजिक व साहित्यिक परिवर्तनाचे ‘अशोकचक्र’ — डॉ. सतीश तराळ!
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. २ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे बहुप्रसवा प्रतिभेचे धनी, शब्दप्रभू आणि शैलीकार होते. ते सामाजिक व साहित्यिक क्रांतिकारक असून खऱ्या अर्थाने परिवर्तनाचे ‘अशोकचक्र’ होते. ४० कादंबऱ्या आणि १३ कथासंग्रहांच्या माध्यमातून त्यांनी उपेक्षितांचे भावविश्व मांडले. मार्क्सवाद आणि आंबेडकरवादाचा अद्भुत संगम त्यांच्या विचारसरणीत होता,” असे उद्गार डॉ. सतीश तराळ यांनी काढले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) अमरावती जिल्हा व शहर शाखेच्या वतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव व पाक्षिक सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राधानगर येथील गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टमध्ये हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि विचारमंथनात्मक वातावरणात पार पडला.
सभेत अंनिसच्या राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संघटनात्मक वाढ, काळी जादू प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी आणि बुवाबाजी विरोधी संघर्षावर चर्चा करण्यात आली.
यावेळी दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, राधानगर येथे “तुकडोजी महाराज आणि अंधश्रद्धा निर्मूलन” या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
या सभेला अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण तडस, नरेंद्र धर्माळे, विजय डवरे, सचिन खोब्रागडे, दिगंबर मेश्राम, सचिन वासनिक, पल्लवी ढोले, बबिता वानखडे, राहुल खंडारे आणि प्रवीण वासनिक यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संपर्क आशिष देशमुख यांनी साधला, संचालन दिलीप लाडे यांनी केले, तर आभार पल्लवी ढोले यांनी मानले. सभेच्या शेवटी वाशीम जिल्ह्याचे माजी कार्याध्यक्ष पी. एस. खंदारे यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.






