
महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये ८.५७ लाख कोटींचे ६७ सामंजस्य करार; २.९१ लाख नवीन रोजगारनिर्मितीचा मार्ग सुकर!
मुंबई, विशेष प्रतिनिधी दि. ०१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:


“लोकशिक्षक संत गाडगेबाबा यांच्यावरील ‘मायबापहो… हाक गाडगेबाबांची’ आणि ‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात’ असा कर्मयोगाचा संदेश देणाऱ्या संत सावता महाराजांवरील ‘अवघी विठाई माझी’ या पुस्तकांच्या लेखनामुळेच मला हा सन्मान मिळाला आहे. हा पुरस्कार मी सर्व सामाजिक, वैचारिक व वारकरी संत परंपरेतील संतांना नम्रपणे समर्पित करतो,” अशी प्रतिक्रिया जयकुमार चर्जन यांनी व्यक्त केली.

“अनेक वर्षांपासून घराचे स्वप्न पाहणारे हे लाभार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कष्टकरी वर्गातील आहेत. रावेतचा प्रकल्प रद्द झाल्याने आधीच या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे किवळे प्रकल्पात त्यांना मुद्रांक शुल्कात सवलत आणि पीएमएवाय (PMAY) अंतर्गत अनुदान मिळणे हा त्यांचा हक्क आहे. सरकार जोपर्यंत अंतिम निर्णय घेत नाही, तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील.”— काशिनाथ नखाते, अध्यक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ.
पुणे विभाग (१२ सप्टेंबर २०२६) स्थळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे,
ई-मेल pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in
nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in
ई-मे amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in
छत्रपती संभाजीनगर विभाग (२१ सप्टेंबर २०२६) स्थळ: स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर,
ई-मेल csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in
konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in
nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in
नागरिक आणि संबंधित घटक आपापल्या विभागाच्या दिलेल्या ई-मेल आयडीवर आपल्या लेखी सूचना व अभिप्राय पाठवू शकतात. या विभागनिहाय संवादातून आणि ईमेलद्वारे प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचा टास्क फोर्स सखोल अभ्यास करेल.
या अभ्यासाच्या आधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालणे, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण करणे, प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि परीक्षा व्यवस्था अधिक सुटसुटीत व उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनाला सविस्तर शिफारशी सादर केल्या जातील. भेटींची वेळ आणि सहभागाची प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


“आदिवासी विद्यार्थ्यांचे सुदृढ आरोग्य आणि दर्जेदार शिक्षण याला विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. अॅनिमिया निवारण कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील रक्तक्षयाची समस्या लक्षात घेऊन व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. अवघ्या दीड महिन्यात ७९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण झाली असून, आवश्यकतेनुसार पुढील उपचार व पोषणात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.”— लीना बनसोड (आयुक्त, आदिवासी विकास विभाग)
पिंपरी चिंचवड: सार्वजनिक गणेशोत्सव जवळ आला असून पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी वर्गणी किंवा देणगी गोळा करणाऱ्या सर्व सार्वजनिक मंडळांना धर्मदाय आयुक्तांची (Charity Commissioner) पूर्वपरवानगी घेणे कायद्यानुसार बंधनकारक करण्यात आले आहे. पूर्वपरवानगीशिवाय किंवा अनधिकृतपणे वर्गणी गोळा करणाऱ्यांवर कडक कायदेशीर व फौजदारी कारवाई केली जाईल, असा कडक इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५०’ (Bombay Public Trusts Act, 1950) च्या कलम ४१-क नुसार, कोणत्याही सार्वजनिक उत्सवासाठी किंवा धार्मिक/दात्यांच्या कामासाठी नागरिकांकडून रोख रक्कम वा वस्तू स्वरूपात वर्गणी जमा करण्यापूर्वी धर्मदाय कार्यालयाची रीतसर मंजुरी घेणे आवश्यक आहे. वर्गणी ही पूर्णपणे स्वैच्छिक असली पाहिजे. कोणत्याही नागरिकावर वर्गणीसाठी सक्ती किंवा जबरी करता येणार नाही. मंडळांना वर्गणी गोळा करण्याच्या परवानगीसाठी धर्मदाय आयुक्तांच्या अधिकृत Charity Commissioner Portal वर आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहर हे प्रशासकीय व न्यायक्षेत्रीय अधिकारानुसार पुणे विभागाच्या (Pune Region) अंतर्गत येते. शहरात कार्यरत असलेल्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुणे येथील सहधर्मदाय आयुक्त कार्यालयातून परवानगी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
कार्यालयाचा पत्ता: सहधर्मदाय आयुक्त कार्यालय, १, बाळकृष्ण सखाराम ढोले पाटील रोड, संगमवाडी, पुणे – ४११००१.
प्रमुख अधिकारी: श्री. दिनेश कोठलीकर (सहधर्मदाय आयुक्त, पुणे विभाग)
कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सर्व गणेशोत्सव मंडळांनी मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सहधर्मदाय आयुक्त दिनेश कोठलीकर यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
