news
Home मुख्यपृष्ठ ‘महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६’: २३ ऑक्टोबरला मतदान अन् २७ ऑक्टोबरला निकाल!

‘महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६’: २३ ऑक्टोबरला मतदान अन् २७ ऑक्टोबरला निकाल!

सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजीत वंजारींसह ५ आमदारांची मुदत संपणार; निवडणूक आयोगाकडून घोषणा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान; पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

मुंबई/पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतील द्विवार्षिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम आज जाहीर केला आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर, पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक आणि पुणे विभाग शिक्षक या पाच प्रमुख मतदारसंघांसाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे.
विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ दि. ६ डिसेंबर २०२६ रोजी संपुष्टात येत असल्याने निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे.

अधिसूचना प्रसिद्धी २९ सप्टेंबर २०२६ , उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर २०२६ , अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर २०२६, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ ऑक्टोबर २०२६ ,मतदानाची तारीख व वेळ २३ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ८ ते सायंकाळी ४) , मतमोजणी २७ ऑक्टोबर २०२६ , निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख ३१ ऑक्टोबर २०२६

 

सतीश चव्हाण (औरंगाबाद विभाग पदवीधर) , अरुण लाड (पुणे विभाग पदवीधर) , अभिजीत वंजारी (नागपूर विभाग पदवीधर) , किरण सरनाईक (अमरावती विभाग शिक्षक) , जयंत आसगावकर (पुणे विभाग शिक्षक) या ५ विद्यमान सदस्यांची मुदत संपणार.

भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करताच संबंधित पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता (Model Code of Conduct) तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे. या निवडणुका सुरळीत व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!