आकुर्डी: केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक अशा जातीय जनगणनेच्या निर्णयाचे आज आकुर्डी परिसरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. शुक्रवार, दिनांक २ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आकुर्डीतील संभाजीनगर, शाहूनगर मंडळाच्या वतीने मोहननगर कमानीजवळील चौकात या निर्णयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार माननीय श्री अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले आणि उपस्थित नागरिकांना लाडू भरवून आनंद व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना आमदार अमित गोरखे यांनी जातीय जनगणनेच्या निर्णयाचे भविष्यात नागरिकांना होणारे महत्त्वपूर्ण फायदे विशद केले. “देशाच्या पंतप्रधानांचा आम्हाला अभिमान आहे आणि असे धाडसी निर्णय केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रातील कार्यरत असलेले NDA सरकारच घेऊ शकते,” असे गौरवोद्गार आमदार अमित गोरखे यांनी काढले.

या आनंदोत्सवाच्या कार्यक्रमाला माजी नगरसेवक आणि माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे, भाजप उपाध्यक्ष गणेश लंगोटे, श्री कैलास कुटे, सौ मनिषा शिंदे, चंद्रकांत शिंदे, अविनाश गावडे, जनार्दन तलारे, राकेश ठाकूर यांसारख्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सर्वांनी एकत्रितपणे या ऐतिहासिक निर्णयाचा आनंद साजरा केला आणि पंतप्रधान मोदींच्या कार्याचे कौतुक केले.
#जातीयगणना #केंद्रसरकार #नरेंद्रमोदी #अमितगोरखे #आकुर्डी #लाडूउत्सव #आनंदोत्सव #ऐतिहासिकनिर्णय #भाजपा #एनडीए














