news
पिंपरी-चिंचवडमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना निश्चित! १७ लाखांहून अधिक मतदारांसाठी ३२ प्रभागांतून १२८ नगरसेवक निवडले जाणारपिंपरी-चिंचवडकरांनो, तयार राहा! महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; आयोगाकडून संपूर्ण वेळापत्रक जाहीरहक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण! प्रधानमंत्री आवास योजनेतील १९४५ सदनिकांची पारदर्शक सोडत; महापालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद – आमदार शंकर जगतापपिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला प्रशासकांकडून ‘ग्रीन सिग्नल’! गवळीनगरसह चऱ्होली, दिघी, चिखली परिसरात रस्ते व स्थापत्य कामांना मंजुरी‘हॅपिनेस स्ट्रीट २.०’ ठरला सामाजिक बांधिलकीचा उत्सव! पिंपरी-चिंचवडकरांचा योग, झुम्बा आणि लाईव्ह शोमध्ये तुफान प्रतिसाद
Home क्रिडा कला आणि कौशल्याचा संगम! कोया फिटनेसचा नेत्रदीपक दशकपूर्ती सोहळा!

कला आणि कौशल्याचा संगम! कोया फिटनेसचा नेत्रदीपक दशकपूर्ती सोहळा!

आमदार, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; 70 मुलींनी सादर केले योगासन आणि जिम्नॅस्टिक्सचे चित्तथरारक प्रात्यक्षिक!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील सायंटिफिक रिदमिक जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण देणारी पहिली आणि एकमेव संस्था असलेल्या कोया फिटनेस फेडरेशनने रविवारी (दि. २७ एप्रिल) आचार्य अत्रे रंगमंदिरात आपला दशकपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. या संस्थेत केवळ मुलींनाच प्रशिक्षण दिले जाते, हे विशेष उल्लेखनीय आहे.

या शानदार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे केंद्रप्रमुख डॉ. मनोज देवळेकर, सिम्बायोसिस स्कूल ऑफ स्पोर्ट्स सायन्सच्या संचालिका डॉ. नयना निमकर, पिंपरी-चिंचवड जिम्नॅस्टिक्स संघटनेचे संजय मंगोडेकर आणि चेतन भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात योगसनांच्या सुंदर प्रात्यक्षिकाने झाली. कोया संस्थेतील तब्बल ७० मुलींनी योगासन आणि रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या कौशल्यांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. आमदार अमित गोरखे यांनी संस्थेला प्रशिक्षणासाठी येणाऱ्या जागेच्या अडचणींसाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच, मुलींसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही ते म्हणाले. खेळाडू अभिश्री राजपूत हिच्या उल्लेखनीय कामगिरीने प्रभावित होऊन त्यांनी तिला ‘नवीन युगाची हिरकणी’ अशी खास उपाधी दिली. आमदार उमा खापरे यांनीही अल्पवयात अभिश्रीने मिळवलेल्या यशाचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डॉ. नयना निमकर यांनी खेळाडूंच्या प्रगतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या कामगिरीत वाढ करण्यासाठी संस्थेला मदतीचा हात पुढे केला. डॉ. मनोज देवळेकर यांनी भविष्यात, म्हणजेच २०२६ च्या ऑलिम्पिकमध्ये कोया फिटनेसचे खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतील, असा दृढ विश्वास व्यक्त केला. क्रीडाकुलच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थिनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत, हे क्रीडाकुलचे मोठे यश आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमादरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. फेडरेशनच्या संचालिका अभिश्री राजपूत यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानले. कोया फिटनेस फेडरेशनचा हा दशकपूर्ती सोहळा एक यशस्वी आणि प्रेरणादायी कार्यक्रम ठरला.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!