news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडच्या सौंदर्यात भर: बटरफ्लाय पुलाचे रात्रीचे रूप मोहक

पिंपरी-चिंचवडच्या सौंदर्यात भर: बटरफ्लाय पुलाचे रात्रीचे रूप मोहक

कला आणि तंत्रज्ञानाचा संगम; हा पूल आता केवळ वाहतुकीचा दुवा नाही, तर शहराचे नवे प्रतीक. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

बटरफ्लाय पूल ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू; विद्युत रोषणाईच्या झगमगाटाने रात्रीच्या प्रवासाला नवा अनुभव

 


 

उच्च दर्जाचे एलईडी तंत्रज्ञान वापरून पुलावर साकारला रंगोत्सव; कमी विजेत अधिक आकर्षकपणा

 

पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे, १० सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पवना नदीवरील थेरगाव ते चिंचवड दरम्यानचा ‘बटरफ्लाय पूल’ आता केवळ वाहतुकीचा दुवा राहिला नसून, शहरातील एक नवा आणि आकर्षक केंद्रबिंदू ठरला आहे. रात्रीच्या वेळी विविध रंगांच्या छटांनी उजळून निघालेला हा पूल प्रवाशांना आणि परिसरातील नागरिकांना एक वेगळाच, नेत्रसुखद अनुभव देत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागाने आधुनिक एलईडी तंत्रज्ञानाचा वापर करून ही आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.


शहराच्या सौंदर्याचे प्रतीक

 

पिंपरी चिंचवड महापालिका शहरात आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच सौंदर्यपूर्ण वास्तू निर्माण करण्यावर भर देत आहे. त्यापैकीच एक असलेला हा बटरफ्लाय पूल आता शहरातील एक महत्त्वाचे आकर्षण बनला आहे. यावर केलेल्या रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी पुलावरून प्रवास करणारे आणि परिसरातील अनेक नागरिक त्याची छायाचित्रे व व्हिडिओ काढत आहेत, ज्यामुळे हा पूल आता वाहतुकीपलीकडे जाऊन पर्यटनाचे एक ठिकाण बनला आहे.

याबद्दल बोलताना महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह म्हणाले, “बटरफ्लाय पूल हा केवळ थेरगाव आणि चिंचवडला जोडणारा दुवा नसून, तो पिंपरी चिंचवड शहराच्या आधुनिक आणि सौंदर्यपूर्ण ओळखीचे प्रतीक आहे. या पुलावरील आकर्षक रोषणाईमुळे नागरिकांना एक नवा अनुभव मिळत असून, त्याचे सौंदर्य जपणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”


तंत्रज्ञानाचा अनोखा संगम

 

या रोषणाईसाठी उच्च दर्जाचे एलईडी लिनिअर वॉश लाईट्स (IP65) वापरण्यात आले आहेत, ज्यांना ५१२ डीएमएक्स पॉवरसह आरजीबी तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. यामुळे पुलावरील रोषणाई विविध रंगांच्या छटा निर्माण करून प्रत्येक क्षणी वेगळेच दृश्य साकारते.

या तंत्रज्ञानाबद्दल अधिक माहिती देताना सहशहर अभियंता अनिल भालसाकळे म्हणाले, “बटरफ्लाय पुलावर फसाड पद्धतीची विद्युत रोषणाई केली आहे, ज्यामुळे केवळ २२ किलोवॅट एवढीच वीज खर्ची पडते. अशाच पद्धतीने शहरात इतर पुलांवरही आकर्षक रोषणाई करण्याचे नियोजन आहे.” यापूर्वीच चिंचवड येथील मदर तेरेसा उड्डाणपूल आणि नाशिक फाटा येथील जे. आर. डी. टाटा उड्डाणपुलावरही अशाच प्रकारची रोषणाई करण्यात आली असून, भक्तीशक्ती येथील उड्डाणपुलावरील काम प्रगतीपथावर आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!