news
पिंपरीतील ‘श्रीटिकेल’ कंपनीच्या २७५ कामगारांनी केले रक्तदान; ‘वायसीएम’ मधील गरीब रुग्णांना मिळणार जीवनदान!पिंपरी-चिंचवडमधील १३४ मनपा शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी घुमला ‘ओंकार’ नाद! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभागपिंपरी-चिंचवड मनपा आणि योग विद्या धामच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ संकल्पनेवर भव्य योग सोहळा!रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त
Home पिंपरी चिंचवड एकाच पक्षात दोन गट: भाजपमधील कुरघोडीच्या राजकारणामुळे ‘ऐतिहासिक मानवंदना’ वादाच्या भोवऱ्यात

एकाच पक्षात दोन गट: भाजपमधील कुरघोडीच्या राजकारणामुळे ‘ऐतिहासिक मानवंदना’ वादाच्या भोवऱ्यात

महापालिकेची परवानगी नाकारूनही कार्यक्रमाची तयारी सुरू; पोलीस प्रशासनावर 'बघ्याची भूमिका' घेतल्याचा आरोप. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

वादग्रस्त ‘मानवंदना’ कार्यक्रम चर्चेत: अपूर्ण पुतळ्याच्या जागेवरून भाजपमध्येच धुसफूस

 

 

आमदार महेश लांडगे यांच्यावर सचिन काळभोर यांचा गंभीर आरोप; पोलीस प्रशासनाकडे कारवाईची मागणी

 

पिंपरी, पुणे, प्रतिनिधी शाम सोनवणे १४ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण होण्याआधीच मोठा वाद निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालकीच्या या अपूर्ण जागेवर आमदार महेश लांडगे यांनी ‘ऐतिहासिक मानवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेत, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी या कार्यक्रमाला अनधिकृत ठरवत, पोलीस प्रशासनावर ‘बघ्याची भूमिका’ घेतल्याचा आरोप केला आहे.


 

महापालिकेची परवानगी नाकारली, तरीही कार्यक्रम

 

मागील महिन्यात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीच्या सभेत एक ठराव मंजूर केला होता, त्यानुसार महापालिकेची मैदाने, शाळा किंवा इतर कोणत्याही मालमत्तेचा वापर खाजगी कार्यक्रमांसाठी करण्यास मनाई आहे. या नियमाचे उल्लंघन करून आमदार लांडगे यांनी पुतळ्याच्या ठिकाणी ‘ऐतिहासिक मानवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महापालिका प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असूनही, पोलिसांकडून या कार्यक्रमाला पाठबळ मिळत असल्याचा आरोप सचिन काळभोर यांनी केला आहे. त्यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना स्वतः लक्ष घालून कारवाई करण्याची विनंती केली आहे.


 

दोन कोटींचा खर्च, ढोल-ताशांचा गजर

 

जवळपास ८५ टक्के काम पूर्ण झालेल्या या पुतळ्याच्या ठिकाणी तीन हजार ढोल आणि एक हजार ताशा पथकासह भव्य कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. आमदार लांडगे यांनी या कार्यक्रमाच्या जाहिरातीवर सुमारे दोन कोटी रुपये खर्च केल्याचा दावा काळभोर यांनी केला आहे. हे सर्व कार्यक्रम वैयक्तिक पातळीवर आयोजित केले जात असून, त्याचा महापालिका प्रशासनाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


 

पक्षामधील कुरघोडीचे राजकारण

 

या प्रकरणाने भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सचिन काळभोर आणि आमदार महेश लांडगे दोघेही एकाच पक्षाचे (भाजप) असूनही, त्यांच्यातील वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. दोघेही एकमेकांवर कुरघोडी करत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!