news
पिंपरीतील ‘श्रीटिकेल’ कंपनीच्या २७५ कामगारांनी केले रक्तदान; ‘वायसीएम’ मधील गरीब रुग्णांना मिळणार जीवनदान!पिंपरी-चिंचवडमधील १३४ मनपा शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी घुमला ‘ओंकार’ नाद! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभागपिंपरी-चिंचवड मनपा आणि योग विद्या धामच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ संकल्पनेवर भव्य योग सोहळा!रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त
Home पिंपरी चिंचवड ‘देव भाऊ’ जाहिरातीवरून नवा वाद: राजकीय स्वार्थासाठी महापुरुषांचा वापर?

‘देव भाऊ’ जाहिरातीवरून नवा वाद: राजकीय स्वार्थासाठी महापुरुषांचा वापर?

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांकडे चौकशीची मागणी; सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कारवाईची मागणी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टर्सवरून नवा वाद

 

 

 

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी शाम सोनवणे १६ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड शहरात छत्रपती शिवाजी महाराज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेच्या पोस्टरवरून एक नवा वाद निर्माण झाला आहे. शहरातील भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलांच्या भिंतींवर लावण्यात आलेल्या या पोस्टरमुळे दोन्ही महापुरुषांची आणि घटनात्मक पदाची विटंबना होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना पत्र देऊन तातडीने चौकशी व कारवाई करण्याची मागणी केली आहे.


 

‘देव भाऊ’ जाहिरातीवरून वाद

 

राज्यात “देव भाऊ” या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिवादन करतानाचे पोस्टर विविध माध्यमांवर प्रसिद्ध झाले होते. याच जाहिरातीचे लोण पिंपरी-चिंचवड शहरात पोहोचले असून, काही ठिकाणी हे पोस्टर सार्वजनिक भिंतींवर लावण्यात आले आहेत. भापकर यांच्या म्हणण्यानुसार, हे पोस्टर अशा ठिकाणी लावले आहेत की रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे त्यावर चिखल उडत आहे, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचा अपमान होत आहे.


 

सीसीटीव्ही तपासून कारवाईची मागणी

 

या कृतीमागे काही राजकीय स्वार्थ असल्याचा संशय भापकर यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी दोन्ही आयुक्तांना विनंती केली आहे की, ज्या ठिकाणी असे बॅनर किंवा पोस्टर्स लावले आहेत, ते तातडीने काढून टाकावे. तसेच, या भागांतील सीसीटीव्ही फुटेज तपासून बॅनर लावणारे कोण आहेत, त्यांचा उद्देश काय आहे, याचा तपास करून संबंधित समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!