news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड ५० हजार रुपये हेक्टरी मदत द्या! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी कष्टकरी महासंघाचा ‘निकषांचा डोंगर’ तोडण्याचा इशारा

५० हजार रुपये हेक्टरी मदत द्या! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी कष्टकरी महासंघाचा ‘निकषांचा डोंगर’ तोडण्याचा इशारा

कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली चिंचवडमध्ये जोरदार आंदोलन; 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

‘शेतकरी नुकसानात, कामगार मैदानात’! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी कष्टकरी संघर्ष महासंघाचे चिंचवडमध्ये जोरदार आंदोलन

 


 

राज्यातील  २४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; कामगार नेते काशिनाथ नखाते यांची ‘निकषांचा डोंगर’ न उभारता हेक्टरी ५०  हजार रुपये मदतीची मागणी.

 

पिंपरी,  प्रतिनिधी शाम सोनवणे, २७ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले मोठे नुकसान आणि वाढलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर, आज कष्टकरी संघर्ष महासंघाने चिंचवड येथील थरमॅक्स चौकात जोरदार आंदोलन केले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तत्काळ सरसकट भरघोस अर्थसहाय्य द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

 

राज्यातील भयावह स्थिती आणि आत्महत्या

 

महाराष्ट्र राज्यात धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, सोलापूर, जालना यांसारखे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले असून, सुमारे २४ लाख हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे  २ लाख २३  हजाराहून अधिक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

काशिनाथ नखाते यांनी यावेळी बोलताना, ऐन दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य वाढत असल्याचे सांगितले. त्यांनी बीडचे रमेश गव्हाणे, धाराशिवचे लक्ष्मण पवार आणि सोलापूरचे शरद भागवत यांसारख्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची उदाहरणे देत, “या संकटाच्या काळात त्यांचा जीव वाचवून शेतकऱ्यांना धीर आणि दिलासा देणे गरजेचे आहे,” असे आवाहन केले.

 

‘निकषांचा डोंगर’ उभा न करण्याची मागणी

 

नखाते यांनी सरकारकडून मदत देताना लावण्यात येणाऱ्या जाचक अटींवर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले:

“सरकारकडून नुकसान भरपाई देण्यासाठी जीपीएस अद्ययावत असलेला फोटो, ई पीक पाहणी केलेली नोंदणी, ॲग्रीस्टॅग शेतकरी ओळख क्रमांक अशा प्रकारची बंधने घालण्यात आली आहेत. हा निकषांचा डोंगर पार करता-करता अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहतील. सध्याचे संकट मोठे आहे, प्रसंगी सरकारवर अजून कर्ज झाले तरी चालेल, मात्र जगाचा पोशिंदा अन्नदाता शेतकरी जगला पाहिजे.”

आंदोलनातील प्रमुख मागण्या

 

विविध घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज बुलंद केला. यावेळी ‘मदत करा शेतकऱ्यांना मदत करा’, ‘शेतमजुरांना श्रम नुकसान म्हणून २५ हजार रुपये द्या’ अशा घोषणा देण्यात आल्या. कष्टकरी संघर्ष महासंघाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:

  1. राज्यात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी.
  2. शेतकऱ्यांना निकषांची अट न लावता सरसकट हेक्टरी  ५०  हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी.
  3. अतिवृष्टीत पडलेल्या घरांसाठी भरघोस मदत द्यावी.
  4. गाय, म्हैस, बैल, शेळी यांसारख्या मृत जनावरांना भरघोस मदत देऊन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे.

या मागण्यांचे निवेदन मेलद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले असून, सोमवारी (दि. २९) तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, महिला अध्यक्ष माधुरी जलमूलवार, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, किरण साडेकर,महादेव गायकवाड,किसन भोसले, नंदा जाधव, उज्वला साळुंखे,वंदना राऊत,सुरेखा भुस्कुटे, उज्वला चव्हाण,ललिता माळी, मंदा डोंगरे,साधना हेवळकर, रमाकांत अडागळे, अविनाश गिरी, बाबा मराठे, सोमनाथ सोमवंशी प्रचंड संख्येने उपस्थित होते.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!