‘कागदोपत्री’ बंदी! पिंपरी-चिंचवडमध्ये प्लास्टिक कॅरीबॅगचा सर्रास वापर; शिस्त मोडणाऱ्या व्यापारी, टपरीचालकांचा नियमांना हरताळ
कारवाईनंतर लगेच ‘जैसे थे’ स्थिती; प्लास्टिक पिशवी आढळल्यास हजार ते हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद.
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे सप्टेंबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी राज्य शासनाने मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅगवर काही वर्षांपूर्वी बंदी घातली. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात ही बंदी केवळ कागदोपत्रीच उरल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या कारवाईनंतर काही दिवस शिस्त पाळली जाते, पण त्यानंतर बाजारपेठा, किराणा दुकाने, भाजी मंडई, हॉटेल्स आणि टपऱ्यांमध्ये अजूनही प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा सर्रास वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे.
नियमांना हरताळ आणि अपुरी कारवाई
शहरातील अनेक व्यापारी ग्राहकांना सहजपणे कमी दर्जाच्या प्लास्टिक पिशव्या देत आहेत. यामुळे महापालिका प्रशासनाची कारवाई अपुरी आणि कायमस्वरूपी परिणामकारक ठरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दंडाची भीती नसल्यामुळे व्यापारी निर्धास्तपणे प्लास्टिकचा वापर करत आहेत.
- पिंपरी, चिंचवडसह शहरातील अन्य बाजारपेठांमध्ये ग्राहकांच्या हातात प्लास्टिकच्या पिशव्या सहज पाहायला मिळतात.
- महापालिकेच्या आरोग्य व पर्यावरण विभागामार्फत कारवाई केल्याचा दावा केला जातो, पण ती काही दिवसांनी निष्प्रभ ठरते.
क क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आरोग्य अधिकारी तानाजी दाते यांनी माहिती दिली की, “महापालिकेच्या आरोग्य व पर्यावरण विभागामार्फत वेळोवेळी कारवाई केली जाते. मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यांकडून दंड वसूल केला जातो.”
दंडाची रक्कम आणि नियमावली
प्लास्टिक बंदीचा नियम मोडल्यास महापालिकेकडून कठोर दंडाची तरतूद आहे:
- पहिल्यांदा आढळल्यास: हजार रुपये दंड.
- दुसऱ्यांदा आढळल्यास: हजार रुपये दंड.
- तिसऱ्यांदा आढळल्यास: हजार रुपये दंड.
पुनःपुन्हा नियम तोडणाऱ्यांवर गुन्हाही दाखल करण्याची तरतूद आहे.
जागृतीसह कारवाईचा बडगा
पालिकेच्या मते, प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देण्यास मनाई आहे. पालिका जनजागृतीवर भर देत असली तरी, प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाई झाल्यानंतरही बाजारात प्लास्टिक पिशव्या पाहायला मिळत आहेत.
नागरिकांना आवाहन
या समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. महापालिकेने आवाहन केले आहे की, नागरिकांनी स्वतः कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा आणि प्लास्टिक पिशव्या नाकारून शहराला ‘प्लास्टिकमुक्त’ करण्यास हातभार लावावा.
दरम्यान, काही दुकानदारांनी मात्र प्लास्टिक पिशव्या पूर्णपणे बंद करून, ग्राहकांना स्वतःची पिशवी आणण्यास सांगण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर आपल्या दुकानाच्या नावाने कापडी पिशव्या तयार करून ग्राहकांना सामान देण्यासाठी वापरात आणल्या आहेत, जे एक सकारात्मक चित्र आहे.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
