news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड वाईटावर चांगल्याचा विजय! पिंपळे सौदागरमध्ये जनसागराच्या उपस्थितीत भव्य ७० फुटी ‘रावण दहन’ सोहळा संपन्न

वाईटावर चांगल्याचा विजय! पिंपळे सौदागरमध्ये जनसागराच्या उपस्थितीत भव्य ७० फुटी ‘रावण दहन’ सोहळा संपन्न

'शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन'चा पुढाकार; तरुणांनी व्यसनाधीनता सोडून विधायक कामांमध्ये सक्रिय व्हावे, मान्यवरांचे आवाहन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

फुटी रावणाचे दहन! पिंपळे सौदागरमध्ये मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत भव्य ‘विजयोत्सव’

 


 

फक्त रावणाचा पुतळा नव्हे, तर ‘मनातील रावण’ जाळण्याचा विधायक सामाजिक संदेश; अवधूत गांधी, मृण्मयी देशपांडे यांच्यासह कलाकारांची मांदियाळी.

 

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:

वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पिंपळे सौदागर येथे ‘शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन’ आणि ‘जयनाथ काटे सोशल फाउंडेशन’ यांच्या वतीने गुरुवारी (दि. ऑक्टोबर ) भव्य फुटी ‘रावण दहन’ सोहळा प्रचंड उत्साहात पार पडला. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न सिताराम काटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘महाराष्ट्रातील सर्वात मोठा’ हा रावण दहन सोहळा पाहण्यासाठी गोविंद यशदा चौक, पिंपळे सौदागर येथे जनसागराची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत आमदार स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांना आदराने स्मरण करून करण्यात आली.

 

मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक संदेशावर भर

 

या सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत संपर्क प्रमुख मिलिंदजी देशपांडे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकरशेठ जगताप, आमदार अमितदादा गोरखे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा कार्यवाह नरेंद्रजी पेंडसे, मा.खासदार श्री अमरजी साबळे आणि पवना सह. बँक व्हा. चेअरमन श्री. जयनाथशेठ काटे यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या वेळी बोलताना मान्यवरांनी दसरा सणाचे खरे महत्त्व स्पष्ट केले. केवळ रावणाचा पुतळा जाळणे पुरेसे नाही, तर प्रत्येकाने आपल्या मनातील ‘आतला रावण’ जाळण्याची गरज आहे, असा विधायक सामाजिक संदेश या सोहळ्यातून देण्यात आला. “अहंकार, द्वेष, मत्सर आणि सामाजिक विषमता यांसारख्या वाईट प्रवृत्तींचा त्याग करा,” असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच तरुणांनी व्यसनाधीनता सोडून विधायक कामांमध्ये सक्रिय व्हावे, असा सल्लाही मान्यवरांनी दिला.

सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

 

रावण दहनाच्या मुख्य सोहळ्यापूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. कुणाल मोरे यांच्या डान्स फ्लोर स्टुडिओच्या ग्रुपने आकर्षक नृत्य सादर केले. तसेच, हिसार (हरियाणा) येथील सुनील अनिल तिलकधारी यांनी साकारलेले हनुमान पात्र आणि त्यांच्या टीमने सादर केलेले महाकाल नृत्य विशेष लक्षवेधी ठरले.

या सोहळ्याला अनेक नामवंत कलावंतांनी हजेरी लावली:

  • अवधूत गांधी (लोकप्रिय गायक)
  • जान्हवी किल्लेकर (मराठी बिग बॉस फेम)
  • मृण्मयी देशपांडे (“मना” चित्रपट फेम अभिनेत्री)
  • अभिज्ञा भावे (तारिणी सिरीयल फेम अभिनेत्री)

सांस्कृतिक कार्यक्रमांची सांगता झाल्यानंतर, वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असणाऱ्या भव्य फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. रावण दहन होताच नागरिकांनी मोठा जयघोष करत हा विजयाचा क्षण मोठ्या उत्साहात साजरा केला.

या भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन अग्रवाल, नीतू अग्रवाल आणि आर जे अक्षय मोरे यांनी केले. शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन आणि जयनाथ काटे सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!