बँकेचे संकट शेतकऱ्यांवर धावून येताच ‘तत्काळ मदतीचा हात’; हजार अडवताच शिवसेना-शेतकरी संघटनेची एन्ट्री!
मूर्तिजापूरमध्ये दोन दिवसांत दोन घटना; ‘जीवंत माणूस मरतो की काय?’ या भीतीने शिवसेना तालुका प्रमुखांनी तातडीने प्रश्न सोडवला.
मूर्तिजापूर, प्रतिनिधी : विलास सावळे, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:
शेतकऱ्यांचे पैसे बँक खात्यात जमा असतानाही अधिकारी विनाकारण टाळाटाळ करत असल्याने निराश झालेल्या एका शेतकऱ्याला वाचवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी त्वरित धाव घेतली. केवळ हजार रुपयांसाठी हतबल झालेल्या या शेतकऱ्याचा प्रश्न त्यांनी सेंट्रल बँकेत त्वरित निकाली काढला.
या घटनेमुळे, “बँक अधिकारी शेतकऱ्यांना का वेठीस धरत असतील, तर याचे कारण एकच आहे, शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण,” असा संतप्त आरोप अरविंद तायडे यांनी केला आहे.
गजानन लोडम यांच्यासाठी तातडीची धाव
ऑक्टोबर रोजी कानडी येथील शेतकरी गजानन लोडम यांच्या सेंट्रल बँकेतील खात्यात हजार रुपये जमा असतानाही, बँक अधिकारी पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. वारंवार निराशेमुळे हतबल झालेले लोडम हे शेवटची संधी म्हणून शिवसेना (उबाठा) मूर्तिजापूर तालुका प्रमुख गजानन दादा चौधरी यांना भेटले आणि सर्व हकीकत सांगितली.
प्रकरणाचे गांभीर्य आणि शेतकऱ्याची हतबलता लक्षात घेता गजानन दादा चौधरी यांनी शिवसेना उबाठा नेते अरविंद तायडे यांना त्यांच्या नातेवाइकाच्या मयत प्रसंगातूनही तात्काळ निघून येण्याचा आग्रह केला. चौधरी यांच्या मनात, “जीवंत माणूस मरतो की काय” हा प्रश्न निर्माण झाला होता.

संघटनेच्या बळावर प्रश्न मार्गी
त्यानंतर कोणताही विचार न करता लेखक अरविंद तायडे यांनी तात्काळ शेतकरी संघटनेचे नेते सुरेश भाऊ जोगळे (अकोला जिल्हा नेते) आणि विजय भाऊ लोडम यांना सोबत घेऊन सेंट्रल बँकेत धाव घेतली.
बँक अधिकारी श्री अर्जुन राठोड यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्याचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात आला. बँक अधिकारी राठोड यांनी यापुढे नेहमी सहकार्याची भावना राहील, असे मत व्यक्त करत शेतकरी गजानन लोडम यांची जीवनातील आशा जिवंत ठेवली.
यापूर्वी सप्टेंबर रोजीही गोरेगाव येथील शेतकरी गजानन दिवतोडे यांचे पैसे महाराष्ट्र बँकेने अडवले होते. तेव्हाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून बँक अधिकाऱ्यांना पैसे देण्यास भाग पाडले होते.
याबद्दल, शिवसेना तालुका प्रमुख गजानन भाऊ चौधरी, शेतकरी संघटनेचे नेते श्री सुरेश भाऊ जोगळे, श्री विजय भाऊ लोडम यांनी शेतकऱ्याला न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
