महाराष्ट्रात ‘बेकायदेशीर जुगार’ चालवणाऱ्यावर MPDA ची पहिली कारवाई; अकोला पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी!
च्या नवीन सुधारणेचा वापर; सार्वजनिक ठिकाणी जुगार चालवणाऱ्या नूर खॉ नियामत खॉ यास वर्षासाठी स्थानबद्ध; जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून गुन्हेगारांना इशारा.
अकोला, प्रतिनिधी : विलास सावळे, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:
गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यात केलेल्या सन च्या सुधारणांचा वापर करत अकोला पोलिसांनी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या कायद्यातील “बेकायदेशीर जुगार चालविणारी व्यक्ती” या नवीन शीर्षकाखाली स्थानबद्धतेची कारवाई करणारे अकोला पोलीस दल हे महाराष्ट्रातील पहिले ठरले आहे.
राज्यातील पहिली कारवाई
महाराष्ट्र शासनाने जून रोजी ‘महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टी वाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, बेकायदेशीर जुगार चालविणाऱ्या… व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम, ‘ (MPDA Act) मध्ये सुधारणा केली होती. याच सुधारणेनुसार अकोला पोलिसांनी तातडीने कठोर पाऊल उचलले आहे.
- आरोपी: नूर खॉ नियामत खॉ (वय वर्षे, रा. ख्वाजा नगर, अकोला).
- गुन्हे: नूर खॉ याच्यावर यापूर्वी सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी जमवून जुगार खेळवणे, जुगार खेळवण्यासाठी अड्डा ठेवणे, तसेच जबरी चोरी आणि अश्लील कृती करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
- परिणामशून्यता: यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, मात्र त्याने जुमानले नाही. त्यामुळे त्याची गुन्हेगारी आणि बेकायदेशीर जुगार चालविण्याची वृत्ती मोडून काढण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
जिल्हादंडाधिकाऱ्यांकडून वर्षासाठी स्थानबद्ध
पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी नूर खॉ यास स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांना सादर केला. जिल्हादंडाधिकारी मीना यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून आणि स्वतःच्या स्त्रोतांद्वारे माहिती मिळवून, सदर व्यक्ती बेकायदेशीर जुगार चालवणारा असल्याची खात्री केली.
यानुसार, जिल्हादंडाधिकाऱ्यांनी ऑक्टोबर रोजी आदेश पारित करून नूर खॉ नियामत खॉ यास एक वर्षासाठी अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. आदेशावरून त्याची तात्काळ अंमलबजावणी करून त्याला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षकांचा कडक इशारा
या ऐतिहासिक कारवाईमुळे अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आणि कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर आगामी जिल्हा परिषद (जि.प.) व महानगरपालिका (मनपा) निवडणुका तसेच सण-उत्सवाच्या काळात MPDA आणि इतर प्रचलित कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोउपनि, माजीद पठाण, पोहेकों. ज्ञानेश्वर सैरिसे, पोकों, उदय ईश्वरीप्रसाद शुक्ला, तसेच पोलीस स्टेशन जुने शहर येथील पोनि. नितीन लेव्हस्कर, पोलीस अमंलदार स्वप्नील पोदाळे, सागर सिरसाट, पंकज उपाध्याय, श्रीकांत पवार, आशिष नांदोकार, पवन डंबलकर यांच्यासह जुने शहर पोलीस स्टेशनच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
