news
पिंपरीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा भव्य कामगार मेळावा; कंत्राटदारांच्या मनमानी कारभाराविरोधात यशवंतभाऊ भोसले कडाडले!पिंपरी-चिंचवडचे २१ ‘बाहुबली’ खेळाडू आंतरराष्ट्रीय मैदानावर फडकवणार तिरंगा; भारतीय सिलंबम संघात झाली निवड!भोसरी एमआयडीसीतील बकाल कारभाराविरोधात उद्योजक आक्रमक; ७२ तासांत अतिक्रमण न हटवल्यास मनपा भवनाला टाळे ठोकण्याचा इशारा!पुणे महापालिकेत ऐतिहासिक दर्गा तोडल्याप्रकरणी प्रचंड गदारोळ; राष्ट्रवादीचे नगरसेवक गफूर पठाण यांच्या अंगावर धावले भाजप नगरसेवक!पिंपरी-चिंचवड मनपाच्या ‘झिरो वेस्ट’ मोहिमेला अथांग यश; महिनाभरात ११ हजार किलोहून अधिक कचऱ्याचे स्रोतस्तरावर वर्गीकरण!
Home पिंपरी चिंचवड दीपावलीच्या प्रकाशासोबत पुस्तकांचा प्रकाश! वाकडमध्ये भव्य साहित्य प्रदर्शन; समाज परिवर्तनासाठी वाचनाला महत्त्व

दीपावलीच्या प्रकाशासोबत पुस्तकांचा प्रकाश! वाकडमध्ये भव्य साहित्य प्रदर्शन; समाज परिवर्तनासाठी वाचनाला महत्त्व

'शब्दा बुक्स' चा उपक्रम वाचनप्रेमींसाठी पर्वणी; 'पुस्तकांच्या प्रकाशाने समाजातील अंधार दूर होईल' – भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दिवाळीपूर्वी ज्ञानाची ज्योत! वाकडमध्ये आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते भव्य पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन

 


 

‘वाचन हीच खरी शक्ती’; मा.नगरसेवक संदीप (आण्णा) कस्पटे यांच्या संकल्पनेतून ‘शब्दा बुक्स’ चा वाचन, साहित्य आणि संस्कारांचा संगम.

 

पिंपरी-चिंचवड, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:

दीपावलीसारख्या उत्साहाच्या काळात साहित्य, वाचन आणि संस्कारांचा संगम साधत वाकड येथे ‘शब्दा बुक्स स्टोअर्स अँड लायब्ररी’ च्या वतीने भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मा.नगरसेवक श्री संदीप (आण्णा) अरुण कस्पटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम वाचनप्रेमींसाठी पर्वणी ठरला आहे.

शुक्रवारी (दि. ऑक्टोबर ) संस्कृती सोसायटी, कस्पटे वस्ती, वाकड येथील मा.नगरसेवक श्री संदीप आण्णा कस्पटे जनसंपर्क कार्यालय येथे या भव्य पुस्तक प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

पुस्तकांच्या प्रकाशाने अंधार दूर होईल – शत्रुघ्न काटे

 

या कार्यक्रमाला आमदार श्री शंकरशेठ जगताप आणि भाजप शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापु) काटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी बोलताना श्री. शत्रुघ्न काटे यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, “वाचन हीच खरी शक्ती असून ती समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे. दीपावलीच्या प्रकाशासोबत जर पुस्तकांचा प्रकाश प्रत्येक घरात पसरला, तर समाजातील अंधार नाहीसा होईल.” या उपक्रमासाठी त्यांनी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित

 

या उद्घाटन सोहळ्यात साहित्य विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात लेखक श्री. नितीन अरुण थोरात, श्री. प्रणव पाटील, आणि लेखिका निकिता आभाळे यांचा समावेश होता.

समाजात वाचनाची गोडी निर्माण व्हावी, साहित्याचा प्रसार व्हावा आणि तरुण पिढीला ज्ञानाचे भांडार उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. या प्रदर्शनात विविध विषयांवरील, तसेच प्रख्यात लेखकांच्या साहित्यकृतींचे दर्शन वाचनप्रेमींसाठी खुले झाले आहे.

दीपावलीच्या सणासुदीच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या साहित्यरूपी दीपज्योतीने उजळलेल्या या उपक्रमाने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. उपस्थितांनी मा.नगरसेवक श्री संदीप (आण्णा) कस्पटे यांच्या या विधायक संकल्पनेचे भरभरून कौतुक केले.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!