‘मन आणि बुद्धी पोसली पाहिजे’: मराठवाडा जनविकास संघाकडून हून अधिक पूरग्रस्त कुटुंबांना आधार
बीड आणि धाराशिव जिल्ह्यात धान्य किटचे वाटप; पूर ओसरल्यावर विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून शालेय साहित्यासाठी ते ऑक्टोबर दरम्यान मदतीचे आवाहन.
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:
मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांमध्ये ‘सेवा हीच ईश्वर पूजा’ या भावनेतून मराठवाडा जनविकास संघ (महाराष्ट्र राज्य) आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम समन्वय समिती यांच्या वतीने अत्यावश्यक मदतीचे मोठे कार्य हाती घेण्यात आले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली एक हजारहून अधिक पूरग्रस्त कुटुंबांना धान्य किट आणि अत्यावश्यक साहित्याचे थेट गावा-गावांत जाऊन वाटप करण्यात आले आहे.
बीड आणि धाराशिव जिल्ह्यात मदतीचे वाटप
या मदतीत तांदूळ, डाळी, बेसन, तेल, साखर, मीठ, मिरची पावडर यांसारख्या धान्यासोबतच ब्लँकेट, चटई, साडी, टॉवेल आणि प्रातिनिधिक स्वरूपात शालेय साहित्याचा समावेश आहे.
बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमध्ये हे किट वाटप करण्यात आले. यामध्ये बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील कोळवाडी, ब्रम्हनाथ बोरगाव, गात शिरापूर तसेच धाराशिव जिल्ह्यातील भूम व परंडा तालुक्यात देवगाव (खुर्द) व वाघेगव्हाण या गावांचा समावेश आहे. तहसीलदार निलेश काकडे यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले.
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील कोळवाडी, ब्रम्हनाथ बोरगाव, गात शिरापूर तसेच धाराशिव जिल्ह्यातील भूम व परंडा तालुक्यात देवगाव ( खुर्द) व वाघेगव्हाण या गावांमध्ये तहसीलदार निलेश काकडे, नायब तहसीलदार पांडुरंग मांडेकर, प्रकाश इंगोले, शाहुराज कदेरे, युवराज माने, बाळासाहेब काकडे, संजय माने, गोकुळ शितोळे, संतोष भोरे, गणेश गंगा विठ्ठल, विवेक पाटील, सुशांत क्षीरसागर, अशोक भोरे, शंकर तांबे, संतोष तांबे, मनोज मोरे, चंद्रकांत मोरे, सतीश मुरकुटे, सूर्यकांत कुरूलकर, दत्तात्रय धोंडगे, वामन भरगंडे, सखाराम वालकोळी, सुग्रीव पाटील, बळिराम कातंगळे, अनिताताई पांचाळ, केशव बोधले, गोविंद तांबवडे, रंगनाथ आवारे, लक्ष्मण जाधव, जीवन बोराडे, कृष्णा जाधवर, सचिन स्वामी, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत किट वाटप करण्यात आले.
मन आणि बुद्धी पोसण्यासाठी ‘शालेय साहित्याची’ गरज
पूरग्रस्त भागात अन्नधान्य व कपडे मिळाल्याने जगण्याचा आधार मिळाला असला तरी, आता विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शालेय साहित्याची तीव्र गरज जाणवत आहे. पूर ओसरल्यावर विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबायला नको, या उदात्त हेतूने मराठवाडा जनविकास संघाने आता ‘मन आणि बुद्धी पोसली पाहिजे’ या उद्देशाने शालेय साहित्य संकलनाचा नवा संकल्प केला आहे.
- मदतीचा टेम्पो: येत्या ते ऑक्टोबर या कालावधीत शेतकऱ्यांसाठी धान्य, गरजू वस्तू आणि विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके, दप्तर, स्टेशनरी यासारख्या साहित्याचा पूर्ण संच घेऊन मदत टेम्पो मराठवाड्याकडे रवाना होणार आहे.
संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी विविध देवस्थाने, प्रार्थनास्थळे आणि मंदिर ट्रस्टला या कार्यात सक्रिय होण्याची विनंती केली आहे. तसेच, नागरिकांनी या ‘यज्ञात फूल न फुलाची पाकळी’ म्हणून आपल्या इच्छेनुसार मदत अरुण कन्स्ट्रक्शन कार्यालय, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड या ठिकाणी जमा करावी, असे कळकळीचे आवाहन केले आहे.
या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपळे गुरव येथील नवचैतन्य हास्ययोग परिवार शाखा क्र. आणि संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पूरग्रस्तांसाठी शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहे. यावेळी संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके, उपाध्यक्ष चांदमल सिंघवी, कार्याध्यक्ष पोपटराव चव्हाण, अरुण चौधरी, दामोदर राणे, अविनाश सोरटे, कुंभार गुरुजी आदी उपस्थित होते.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
