पिंपरी-चिंचवडमध्ये धोकादायक गुन्हेगार ‘MPDA’ खाली स्थानबद्ध; खंडणीखोर ‘बच्चे’, जबरी चोरी करणारा ‘लड्ड्या बहोत’ कारागृहात
पोलीस आयुक्तांचे कठोर धोरण कायम; मध्ये वर्षभरात आणि मागील वर्षी गुन्हेगारांवर कारवाई; गुन्हेगारीवर मोठा वचक.
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील धोकादायक गुन्हेगारांना मोकळीक मिळू नये म्हणून पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी अत्यंत कठोर धोरण अवलंबले आहे. या धोरणांतर्गत एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यान्वये स्थानबद्धतेची व्यापक कारवाई करण्यात आली असून, जबरी चोरी करणारे आणि खंडणी मागणारे सराईत गुन्हेगार नुकतेच एक वर्षासाठी कारागृहात पाठवले आहेत.
चार धोकादायक गुन्हेगार स्थानबद्ध
आयुक्तालयाच्या हद्दीत दहशत माजवून विनयभंग, दुखापत, घरफोडी, फसवणूक आणि खंडणी मागणारे गुन्हेगार यांचा अभिलेख तपासल्यानंतर पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी स्थानबद्धतेचे आदेश पारित केले. हे चारही गुन्हेगार वर्षाच्या कालावधीसाठी वेगवेगळ्या कारागृहात स्थानबद्ध असतील:
गुन्हेगारी नियंत्रणात: वर्षभरात कारवाया
पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.
- एम.पी.डी.ए. कायद्यान्वये सन मध्ये आतापर्यंत एकूण गुन्हेगारांवर स्थानबद्धतेच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत.
- मागील वर्षी, सन मध्ये देखील याच कायद्यान्वये एकूण कारवाया करण्यात आल्या होत्या.
पोलीस दलाने केलेल्या या प्रतिबंधक कारवायांमुळे परिसरातील गुन्हेगारीत घट झाली असून, भविष्यातील गुन्हेगारी नियंत्रणात येणार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ही कामगिरी पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी पूर्ण केली.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
