news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड सावधान! ‘डिजिटल अटक’ करण्याची भीती दाखवून तुमची फसवणूक होतेय; सायबर पोलिसांकडून ‘कूरियर/पार्सल’ स्कॅमची कार्यपद्धती उघड

सावधान! ‘डिजिटल अटक’ करण्याची भीती दाखवून तुमची फसवणूक होतेय; सायबर पोलिसांकडून ‘कूरियर/पार्सल’ स्कॅमची कार्यपद्धती उघड

व्हॉट्सॲप, टेलिग्रामवर कोर्ट रूमचे दृश्य दाखवून मनी लॉंडरिंगच्या नावाखाली पैशाची मागणी; अनोळखी व्हिडिओ कॉल न उचलण्याचे आवाहन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘डिजिटल अटक’ स्कॅमवर पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचा महत्त्वाचा इशारा!

 


 

पोलिसांच्या नावाने व्हिडिओ कॉल करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक वाढली; ‘पोलिस अधिकारी कधीही डिजिटल अटक करत नाहीत’ – सायबर पोलिस ठाण्याचे आवाहन.

 

पिंपरी-चिंचवड,  प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ‘डिजिटल अटकेची’ भीती दाखवून नागरिकांची, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त अधिकारी यांची फसवणूक होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिस स्टेशनने नागरिकांना सावध राहण्याचे आणि घ्यावयाच्या काळजीबद्दल महत्त्वाचे मार्गदर्शन पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा डॉ. शिवाजी पवार यांनी जारी केले आहे.

 

‘डिजिटल अटक’ म्हणजे नेमके काय?

 

सायबर गुन्हेगार व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांना फसवतात. ते स्वतःला गणवेशातील पोलीस अधिकारी, सी.बी.आय., नार्कोटिक्स डिपार्टमेंट किंवा आरबीआयचे अधिकारी भासवतात.

फसवणुकीची पद्धत:

  1. कूरियर/पार्सलचा बहाणा: सुरुवातीला कुरियर कंपनीतून कॉल येतो आणि परदेशात पाठवलेल्या पार्सलमध्ये हत्यारे/ड्रग्ज सापडल्याचे सांगितले जाते.
  2. व्हिडिओ कॉलद्वारे भीती: त्यानंतर गुन्हेगार व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा स्काईपवर व्हिडिओ कॉल करून, पोलीस ठाणे किंवा कोर्ट रूमचे दृश्य दाखवून, तुम्हाला मनी लॉंडरिंग प्रकरणात अटक होणार असल्याची भीती दाखवतात.
  3. पैशाची मागणी: यातून सुटका हवी असल्यास, तुमच्या बँक खात्याचा बॅलन्स, मालमत्ता, पॉलिसी/एफडी मोडलेली रक्कम ‘व्हेरिफाय’ करण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांवर भरण्यास भाग पाडले जाते. पैसे न भरल्यास, ‘तुमच्या घरात येऊन अटक करू’ अशी धमकी दिली जाते.

अशा प्रकारे अनेक नागरिकांची आयुष्यभराची जमापुंजी फसवून घेतली जात आहे.

फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

 

सायबर पोलिसांनी नागरिकांना कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी खालील काळजी घेण्याचे आवाहन केले आहे:

  • पोलिस अधिकारी कोणालाही फोनवरुन अगर व्हिडीओ कॉलवरुन डिजिटल अटक करत नाहीत.
  • अनोळखी व्यक्तीचे व्हिडिओ कॉल उचलू नका अगर त्यांना प्रतिसाद देऊ नका.
  • डिजिटल अटकेसंदर्भात कुणी सांगितल्यास फोन बंद करा आणि तात्काळ स्थानिक पोलिस ठाणे येथे जाऊन तक्रार करा किंवा ऑनलाईन तक्रार करा.
  • तुमची खाजगी माहिती (उदा. बँक अकाऊंट, बॅलन्स, ओटीपी) कोणाशीही शेअर करू नका.
  • गुन्हेगारांनी पाठवलेली लिंक क्लिक करू नका किंवा स्क्रीन शेअर करणारे कोणतेही सोशल मीडिया ॲप (उदा. AnyDesk, TeamViewer) डाउनलोड करू नका.
  • अशा व्यक्तींनी पैशाची मागणी केल्यास, कोणत्याही परिस्थितीत पैसे ट्रान्सफर करू नका.

तक्रार नोंदविण्यासाठी:

  • ऑनलाइन तक्रार: www.cybercrime.gov.in
  • हेल्पलाइन क्रमांक:

© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!