मैराळ दांगट वीर समाजाच्या प्रश्नांवर एकत्र या: पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या मार्गदर्शनानंतर बैठकीचे आयोजन
ज्येष्ठ नेते शिवलाल जाधव यांचे आवाहन; भटक्या विमुक्त जमातींसाठी बेघर नागरिकांना गुरुकुल योजनेत घरे देण्याची संकल्पना.
पुणे / साडेसतरा नळी, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:
पद्मश्री उपप्रकार लक्ष्मण माने यांच्या उपोषण आणि पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने, अखिल महाराष्ट्र मैराळ दांगट वीर समाजसेवा संघटनेच्या माध्यमातून दि. ऑक्टोबर रोजी साडेसतरा नळी येथील दांगट वस्ती समाज मंदिर येथे / फेडरेशनच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर एकजूट होण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.

तुम्ही एकत्र आल्यास प्रश्न सहज सुटेल – शिवलाल जाधव
या बैठकीस ज्येष्ठ नेते आदरणीय शिवलाल जाधव यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, “आपण सर्व एकत्र आल्यास हा प्रश्न सहज सुटण्यासारखा आहे. आपण मुळात ‘ट्रायबल’ म्हणजे जमाती आहोत.”
जाधव यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे:
- गुरुकुल योजना: मुंडवा सेटलमेंटमध्ये भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी उपलब्ध असलेल्या एकर जागेवर, सर्वसमावेशक बेघर नागरिकांना गुरुकुल योजनेअंतर्गत घरे देणे शक्य आहे.
- प्रतिनिधींची गरज: यासाठी प्रत्येक समाजातील जाणकार प्रतिनिधींनी त्यांच्या स्वतंत्र सोसायटी तयार करणे गरजेचे आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिद्धू शिंदे, संघटनेचे अध्यक्ष अनंता भोसले, कार्याध्यक्ष नरेश शिंदे, महिला आघाडी प्रमुख हेमलता चव्हाण, माधवी मोरे, मूळ भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे पदाधिकारी गुरुनाथ गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार एडवोकेट दिलीप कुऱ्हाडे, कुशल संघटक रवींद्र भाट , सेवानिवृत्त उपायुक्त शिवदास जाधव, संघटनेचे उपाध्यक्ष शिवाजी साळुंके, मधुकर मोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक काळूराम कदम, रोहिदास साळुंके, बबन कदम, सज्जन जाधव, संघटनेचे खजिनदार सोपान जाधव, सुभाष मोरे, योगेश चव्हाण, प्रितेश पाटील, शिवाजी पवार, तुळशीराम भोसले , दादा पवार, लक्ष्मण सावंत, दिलीप भोसले, साहेबराव सावंत तसेच युवा कार्यकर्ते दीपक मोरे, राकेश भोसले, समाधान पवार, चंद्रशेखर भोसले, दादा भोसले, कृष्णा भोसले, रोहिदास पाथरकर,, विनोद भोसले, देविदास मोरे, सतीश भोसले, साईनाथ सावंत, अरुण जाधव, पवन भोसले, चेतन मोरे, रुपेश पवार, यूपेश भोसले यांच्यासह अनेक मान्यवर बैठकीस उपस्थित होते.

एकजुटीने भावी पिढीचा प्रश्न सोडवा
अखिल महाराष्ट्र वैराळ दांगट वीर समाजाचे अध्यक्ष अनंता भोसले यांनी देखील आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, “समाजाच्या उद्धारासाठी सगळ्यांनी एकजुटीने या कार्यास मदत करावी, कारण हा प्रश्न येणाऱ्या भावी पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.”
या बैठकीमध्ये तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग उत्साही आणि मोलाचा राहिला. अनेक तरुणांनी भाषणातून या लढ्यामध्ये एकजुटीने सामील होण्याची मते व्यक्त केली. ज्येष्ठ मार्गदर्शक सज्जन जाधव आणि काळूराम कदम यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले, तर आभार दीपक मोरे यांनी मानले. तरुण कार्यकर्त्यांनी उपस्थितांसाठी भोजनाची उत्तम सोय केली होती.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
