केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा जाहीर: पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत नोव्हेंबर!
जिल्हा परिषदेतील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना वेतनश्रेणीची संधी; अर्ज ऑक्टोबरपासून सुरू, परीक्षा ते डिसेंबर दरम्यान.
अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना ‘समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख)’ या पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा “ ची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने ते डिसेंबर या कालावधीत राज्यातील विविध केंद्रांवर आयोजन करण्यात आले आहे.
पदांचा तपशील आणि पात्रता
आरक्षण: या पदांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींसाठी पदे राखीव आहेत. तसेच, रायगड, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, रत्नागिरी, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे व लातूर या जिल्ह्यांमध्ये उर्दू माध्यमाची पदे उपलब्ध आहेत.
पात्रतेचे निकष
या स्पर्धा परीक्षेकरिता फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षकच अर्ज करण्यास पात्र आहेत.
- शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./ बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- सेवेचा अनुभव: जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान वर्षे अखंडित सेवा पूर्ण असणे आवश्यक आहे. (शिक्षण सेवक पदावरील सेवा यात ग्राह्य धरण्यात येईल.)
अन्य जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका किंवा खासगी संस्थेतील शिक्षक या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. तसेच, उमेदवार ज्या जिल्हा परिषदेत कार्यरत असेल, त्याच जिल्ह्यासाठी निवडीस पात्र राहील.
महत्त्वाच्या तारखा
इच्छुक उमेदवारांनी सविस्तर जाहिरात आणि अर्जासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
