news
Home पिंपरी चिंचवड बुलेट, पल्सर, R15 आणि स्प्लेंडर चोरी करणारा ‘ढेकऱ्या’ जेरबंद! ७ गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीवर कारवाई

बुलेट, पल्सर, R15 आणि स्प्लेंडर चोरी करणारा ‘ढेकऱ्या’ जेरबंद! ७ गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीवर कारवाई

गुन्हे शाखा युनिट १ च्या कौशल्यपूर्ण तपासात ४ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस; चिखली परिसरातून आरोपीस अटक. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

रेकॉर्डवरील आरोपीकडून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड!

 


 

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट ची कारवाई; मोरवस्ती चिखली येथून ‘राज ऊर्फ ढेकऱ्या बापर्डेकर’ यास अटक.

 

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ऑक्टोबर (पोलीस प्रेसनोट), मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट ने समांतर तपास करत असताना, रेकॉर्डवरील एका आरोपीस अटक करून शहराच्या विविध भागातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

राज ऊर्फ ढेकऱ्या संतोष बापर्डेकर (वय वर्षे, रा. शिवपार्वती हौ. सोसायटी, मोरेवस्ती, चिखली, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमकी कारवाई कशी झाली?

 

युनिट च्या तपास पथकाला बातमीदाराकडून माहिती मिळाली की, अंगणवाडी चौक, मोरवस्ती, चिखली येथे एक इसम नंबरप्लेट नसलेल्या पल्सर दुचाकीवर फिरत आहे. ही गाडी चोरीची असण्याचा संशय होता.

सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग आणि त्यांच्या स्टाफने तात्काळ कारवाई करत त्या ठिकाणी जाऊन संशयित इसमास ताब्यात घेतले. त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याला अधिक चौकशीसाठी युनिट च्या कार्यालयात आणण्यात आले.

कौशल्यपूर्ण तपासणीदरम्यान आरोपी राज बापर्डेकर याने त्याचे इतर दोन साथीदार (विधीसंघर्षित बालक) यांच्यासह मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

 

आरोपी राज ऊर्फ ढेकऱ्या याच्या अटकेमुळे खालील पोलीस ठाण्यातील गुन्हे उघड झाले आहेत:

  1. संत तुकारामनगर पोलीस ठाणे: (गु. रजि. नं. ) – पल्सर
  2. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे: (गु. रजि. नं. ) – बुलेट
  3. चिखली पोलीस ठाणे: (गु. रजि. नं. ) – आर वन फाईव्ह ()
  4. चाकण पोलीस ठाणे: (गु. रजि. नं. ) – स्प्लेंडर

विशेष म्हणजे, आरोपी राज ऊर्फ ढेकऱ्या संतोष बापर्डेकर याच्यावर यापूर्वीच चिखली आणि पिंपरी पोलीस ठाण्यात एकूण गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त शशीकांत महावरकर , मा. अप्पर पोलीस आयुक्त सारंग अव्हाड, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीक, पोलीस हवालदार बाबासाहेव गर्जे, गणेश महाडीक, सोमनाथ वो-हाडे, महादेव जावळे, शिवराम भोपे, श्रीधन इचके, वाळासाहेव भांगले, अमोल वेताळ, अजित रुपनवर, तुषार वराडे, स्वप्निल महाले, दिलीप राठोड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!