news
Home पिंपरी चिंचवड शेखर सिंह यांच्या जागी श्रावण हर्डीकर: नव्या आयुक्तांची ‘मेट्रो-स्वारी’तून पिंपरी-चिंचवडमध्ये एंट्री

शेखर सिंह यांच्या जागी श्रावण हर्डीकर: नव्या आयुक्तांची ‘मेट्रो-स्वारी’तून पिंपरी-चिंचवडमध्ये एंट्री

मावळत्या आयुक्तांना कुंभमेळा आयुक्तपदाची जबाबदारी; हर्डीकर यांचा विधायक कार्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या 'संगीत खुर्ची'त उत्साहाने सहभाग. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘मेट्रो’तून महापालिकेत दाखल: श्रावण हर्डीकर यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार!

 


 

सार्वजनिक वाहतुकीचा संदेश देत महापालिका वर्धापनदिनी कामकाजास सुरुवात; नागरिकाभिमुख प्रशासनावर भर देण्याची ग्वाही

 

पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे, दिनांक१० ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, ‘महा-मेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी आज ( ऑक्टोबर ) महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचा प्रतीकात्मक संदेश देत महापालिकेत येण्यासाठी मेट्रोने प्रवास केला.

मावळते आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून नुकतीच नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी हर्डीकर यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

शहराच्या शिल्पकाराला अभिवादन

 

पदभार स्वीकारण्यापूर्वी आयुक्त हर्डीकर यांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत येऊन पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार, माजी खासदार तथा नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत आमदार अमित गोरखे देखील उपस्थित होते.

आयुक्त आणि आमदाराचा ‘संगीत खुर्ची’त सहभाग

 

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी रस्सीखेच, संगीत खुर्ची यांसारख्या विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आमदार अमित गोरखे यांनी स्वतः या खेळांमध्ये उत्साहाने सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद अनुभवला आणि कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला.

यानंतर हर्डीकर यांनी आयुक्त दालनात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह विविध विभागप्रमुख व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तातडीने कामकाजाला सुरुवात केली.

 

‘नागरिकाभिमुख प्रशासन’ देण्याचा निर्धार

 

अतिरिक्त पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, “पिंपरी चिंचवड महापालिका ही राज्यातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. स्वच्छता, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रांत शहराची सतत प्रगती होत आहे.”

पुढे बोलताना त्यांनी नागरिक आणि महापालिका अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्याने शहर विकासाच्या नव्या दिशा ठरवत, नागरिकाभिमुख प्रशासन देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!