news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड ‘ज्यांच्या हातात झाडू, त्यांच्या हातात शहराचे आरोग्य’! पिंपळे गुरव येथे कष्टकऱ्यांसोबत मराठवाडा जनविकास संघाची दिवाळी

‘ज्यांच्या हातात झाडू, त्यांच्या हातात शहराचे आरोग्य’! पिंपळे गुरव येथे कष्टकऱ्यांसोबत मराठवाडा जनविकास संघाची दिवाळी

आरोग्य सेवक, सफाई कर्मचाऱ्यांना साड्या, कपडे आणि मिठाईचे वाटप; संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी व्यक्त केली सामाजिक बांधिलकी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कष्टकऱ्यांना ‘पहिला मान’: मराठवाडा जनविकास संघाकडून सफाई कर्मचारी, पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी!

 


 

‘आनंदाची दिवाळी, अगोदर कष्टकरी कामगार वर्गाची’ म्हणत १५ वर्षांची परंपरा कायम; बब्रुवाहन वाघ महाराजांकडून कौतुक

 

पिंपळे गुरव, प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक १३/१०/२०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

समाजसेवेची गेली १५ वर्षांची परंपरा जपत मराठवाडा जनविकास संघाने यावर्षीही दिवाळीचा पहिला मान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सफाई कर्मचारी, आरोग्य सेवक आणि पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना दिला. ‘आनंदाची दिवाळी, अगोदर कष्टकरी कामगार वर्गाची’ या भावनेतून संघटनेने या कर्मचाऱ्यांमध्ये साड्या, कपडे आणि मिठाईचे वाटप केले.

पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या कार्यालयात हा स्नेहाचा कार्यक्रम पार पडला. या मदत वाटप कार्यक्रमात पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि बेसिक प्रिन्सिपल वेस्ट व्हेंचर कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

झाडू हातात त्यांच्याच हातात शहराचे आरोग्य

 

यावेळी ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज यांनी कष्टकऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “ज्यांच्या हातात झाडू आहे, त्यांच्याच हातात शहराचे आरोग्य आहे. अशा लोकांसाठी दिवाळीचा पहिला मान देणे हीच खरी समाजसेवा आहे.”

मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी संस्थेची तळमळ व्यक्त केली. ते म्हणाले, “कष्टकऱ्यांचे जीवन सन्मानाचे व्हावे, ही आमची तळमळ आहे. समाजाच्या या आधारस्तंभांना आधार देणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वामन भरगंडे यांनी केले. त्यांनी गेल्या वर्षांत संघाने केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला आणि कर्मचाऱ्यांच्या सन्मानाची परंपरा अधोरेखित केली. आभार सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले.

यावेळी ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, मनोज मोरे, धनाजी येळकर, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, सखाराम वालकोळी, अर्जुन खामकर, किशोर आटरगेकर, बळीराम कातंगळे, सतीश काळे, बालाजी पांचाळ, अनिताताई पांचाळ, राजेश सातपुते, शिवाजीराव घोडके, गोरख पाटील, लक्ष्मण जाधव, दिलीपराव बारडकर, महादेव करडे, सोमनाथ वैद्य, राहुल कांबळे, शाहूराज कदेरे आदी उपस्थित होते.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!