news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड बाल वैज्ञानिकाची कमाल! आत्मज जैनने IoT आणि AI वापरून पूल सुरक्षित बनवण्याचा प्रकल्प केला सादर, राष्ट्रीय स्तरावर पटकावले पहिले स्थान

बाल वैज्ञानिकाची कमाल! आत्मज जैनने IoT आणि AI वापरून पूल सुरक्षित बनवण्याचा प्रकल्प केला सादर, राष्ट्रीय स्तरावर पटकावले पहिले स्थान

'आत्मजसारखी मुले भारताच्या उज्ज्वल वैज्ञानिक भविष्याची पायाभरणी' - भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे; नोव्हेंबरमध्ये इटलीतील जागतिक स्पर्धेसाठी निवड. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

फक्त १२ व्या वर्षी देशातील सर्वोत्तम युवा वैज्ञानिक: पिंपळे सौदागरचा आत्मज जैनचा राष्ट्रीय गौरव!

 


 

‘वर्ल्ड ऑलिंपियाड’मध्ये राष्ट्रीय विजेता; रोममध्ये जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार – भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याकडून सन्मान

 

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक ११/१०/२०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथील रहिवासी असलेला अवघ्या १२ वर्षांचा बाल वैज्ञानिक कु. आत्मज पराग जैन याने विज्ञान क्षेत्रात अभिमानास्पद यश संपादन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड अँड रोबोटिक्स ऑलिंपियाड () मध्ये त्याने राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक पटकावून ‘यंग सायंटिस्ट – ऑल ओपन कॅटेगरी’ मध्ये राष्ट्रीय विजेता ठरण्याचा मान मिळवला आहे.

आत्मजने आपल्या या यशामुळे येत्या नोव्हेंबर महिन्यात रोम (इटली) येथे होणाऱ्या फिबोनाची इंटरनॅशनल रोबोट ऑलिंपियाड () या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी प्राप्त केली आहे.

 

आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

 

आत्मजने भारतीय पूल संरचनांचे आयुष्य वाढवून त्या अधिक सुरक्षित आणि स्मार्ट बनवण्यासाठी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) आणि (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर करून एक नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केला. देशभरातील शेकडो विद्यार्थ्यांमध्ये त्याने वैज्ञानिक विचार, संशोधन आणि तांत्रिक सर्जनशीलतेचा उत्कृष्ट नमुना सादर केला.

त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढला आहे.

 

भाजप शहराध्यक्षांकडून सन्मान

 

आत्मजच्या या यशाबद्दल भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे यांनी त्याचे शाल आणि ट्रॉफी देऊन सन्मान केला.

यावेळी श्री. शत्रुघ्न काटे यांनी आपले विचार व्यक्त करत म्हणाले की, “पिंपळे सौदागरसारख्या भागातून आत्मजसारख्या तेजस्वी विद्यार्थ्याने देशात पहिला क्रमांक मिळवणे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. व्या वर्षीच त्याने संपूर्ण भारतात आपली ओळख निर्माण केली आहे. आत्मजसारखी मुले भारताच्या उज्ज्वल वैज्ञानिक भविष्याची पायाभरणी करत आहेत. त्याच्या पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”

या प्रसंगी आत्मजचे आई प्रियांका पराग जैन तसेच श्री. दिपक नागरगोजे आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते. आत्मजच्या या यशामुळे संपूर्ण पिंपळे सौदागर परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!