news
Home पिंपरी चिंचवड पूंजीवाद के विभिन्न चरण और आझाद भारत में उभरती चुनौतियां’: ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अरुणकुमार यांचे सखोल विवेचन

पूंजीवाद के विभिन्न चरण और आझाद भारत में उभरती चुनौतियां’: ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अरुणकुमार यांचे सखोल विवेचन

वाढत्या उपभोगवादामुळे लोककल्याण दुर्लक्षित होत असल्याचे मत; समाजवादी नेते प्रा. सदानंद वर्दे यांच्या विचारांचे केले स्मरण. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

💰 ‘उपभोगवादाने मूलभूत समस्या दुर्लक्षित’; समताधिष्ठित विकासासाठी नवी चळवळ आवश्यक – डॉ. अरुणकुमार

 


 

प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष व्याख्यान; भांडवलशाहीच्या प्रभावाने आर्थिक विषमता वाढल्याची ज्येष्ठ अर्थतज्ज्ञांची चिंता

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, मॅक्स मंथन डेली न्यूज:

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी शिक्षणमंत्री आणि समाजवादी नेते प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, त्यांच्या कार्य आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी तर्फे शनिवारी ( ऑक्टोबर ) विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (), दिल्ली येथील माजी प्राध्यापक प्रा. डॉ. अरुणकुमार यांनी ‘पूंजीवाद के विभिन्न चरण और आझाद भारत में उभरती चुनौतियां’ या विषयावर सखोल विवेचन केले.

 

आर्थिक विषमता आणि मूलभूत समस्या दुर्लक्ष

 

डॉ. अरुणकुमार यांनी स्वातंत्र्योत्तर भारतातील आर्थिक विकासाचे विविध टप्पे, वाढता भांडवलशाही प्रभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक विषमतेचा विस्तृत आढावा घेतला. त्यांनी स्पष्ट केले की, आजच्या भारतात आर्थिक विषमता वाढत आहे आणि बाजार उपभोगवादाला प्रोत्साहन देत असल्याने लोककल्याणावरून लक्ष हटवले जात आहे.

डॉ. अरुणकुमार यांनी नोंदवले की, वाढत्या उपभोगवादामुळे रोजगार, उत्पादन आणि उपभोगाच्या क्षेत्रातील असंतुलन वाढत आहे आणि मूलभूत समस्या दुर्लक्षित राहत आहेत. त्यामुळे समताधिष्ठित विकासाच्या दिशेने नवे विचार आणि चळवळ उभी करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रा. वर्दे यांच्या कार्याचा गौरव

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले ज्येष्ठ समाजवादी नेते गजानन खातू यांनी आपल्या भाषणात प्रा. वर्दे यांच्या समाजवादी मूल्यांप्रती असलेल्या निष्ठेचा आणि त्यांच्या शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव केला. प्रा. वर्दे यांचा समाजवादी दृष्टिकोन आजच्या काळातही तितकाच प्रेरणादायी आणि आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.

प्रास्ताविकात सुभाष वारे यांनी प्रा. सदानंद वर्दे यांचे व्यक्तिमत्व आणि परिवर्तनवादी चळवळीतील त्यांच्या योगदानाची माहिती दिली.

व्यासपीठावर प्रा. डॉ. अरुणकुमार, साथी गजानन खातू, झेलम परांजपे, विनोद शिरसाठ आणि प्रा. सुभाष वारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपेंद्र टण्णू यांनी केले, तर आभार राहुल भोसले यांनी मानले.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!