news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड आरोग्यासाठी धाव! PCMC रोटरी रनथॉनमध्ये हाफ मॅरेथॉनसह ३ गटांत स्पर्धा; विश्वविक्रमी धावपट्टू आशिष कसोदेकरांची विशेष उपस्थिती

आरोग्यासाठी धाव! PCMC रोटरी रनथॉनमध्ये हाफ मॅरेथॉनसह ३ गटांत स्पर्धा; विश्वविक्रमी धावपट्टू आशिष कसोदेकरांची विशेष उपस्थिती

जनतेचे शारीरिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी रोटरीचा उपक्रम; जमा झालेला निधी शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणावर खर्च होणार. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

रॅंनथॉनमध्ये ३ नागरिकांचा उत्साहपूर्ण सहभाग; ‘स्वच्छ शहर, हरित शहर’चा संदेश!

 


 

रोटरी क्लब ऑफ निगडी-पुणेच्या १४ व्या वर्षाच्या उपक्रमातून सामाजिक प्रकल्पांना निधी

 

 पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक १३/१०/२०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

रोटरी क्लब ऑफ निगडी–पुणे च्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या () सहकार्याने आयोजित केलेल्या “पीसीएमसी रोटरी मिराए अ‍ॅसेट म्युच्युअल फंड रनथॉन” मध्ये सुमारे तीन हजार नागरिकांनी उत्साहाने धाव घेतली.

निगडी येथे आयोजित केलेल्या या १४व्या रनथॉनमध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांसाठी हाफ मॅरेथॉन ( कि.मी.), १ कि.मी. आणि ५ कि.मी. अशा तीन गटांमध्ये स्पर्धा पार पडली.

 

स्वच्छतेची शपथ आणि मान्यवरांची उपस्थिती

 

यावेळी चे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. ते म्हणाले की, शहराचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असते, तसेच रनथॉनसारख्या उपक्रमातून रोटरी नागरिकांचे शारीरिक आरोग्य निरोगी ठेवण्याचे काम करत आहे. “आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि अधिक हरित ठेवण्याची आपली सर्वांची जबाबदरी आहे, यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला विश्वविक्रमी धावपट्टू आशिष कसोदेकर, आर्यन मॅन विक्रांत गोडगे, मिराए असेटच्या वरिष्ठ उपाध्यक्षा सुनंदा बोरठाकुर, वरिष्ठ उपाध्यक्ष मखदूम अन्सारी, पुणे व्यवस्थापक मयूर धानोपिया, तानाजी फेम अभिनेत्री इलाक्षी गुप्ता, रोटरी क्लबचे प्रांतपाल संतोष मराठे, नियोजित प्रांतपाल नितीन ढमाले, निगडी क्लबचे अध्यक्ष केशव मानगे, रनथॉन संचालक शशांक फडके, सचिव गुरुदीप सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

 

सामाजिक कार्यासाठी निधी

 

क्लबचे अध्यक्ष केशव मानगे यांनी सांगितले की, रनथॉनच्या माध्यमातून जमा झालेला निधी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या सामाजिक प्रकल्पांवर खर्च केला जातो. रनथॉन संचालक शशांक फडके यांनी यंदा मिराए अ‍ॅसेट म्युच्युअल फंड टायटल प्रयोजक म्हणून लाभल्याबद्दल आभार मानले आणि रोटरी व कॉर्पोरेट क्षेत्र एकत्र येऊन समाजात कायमस्वरूपी बदल घडवू शकतील, असे मत व्यक्त केले.

ही स्पर्धा सकाळी  ५:३० वाजता सुरू झाली. विविध गटांतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते खालीलप्रमाणे:

गट (कि.मी. / वय) पुरुष – प्रथम, द्वितीय, तृतीय महिला – प्रथम, द्वितीय, तृतीय
कि.मी. (४५ पुढील) सावळाराम शिंदे, संतू जिवा वारडे, समीर कोयला पूजा ओसवाल, मीना पवार, पूजा महेश्वरी
कि.मी. (४५ च्या आत) प्रवीण कांबळे, निलेश अर्सेकर, राम लोखंडे प्रियंका ओसका, निशा पासवान, श्वेता पाटील
कि.मी. (४५ पुढील) आबासाहेब राऊत, रमेश खरमाळे, शितेश महेश्वरी पूनम जैन (एकच स्पर्धक)
कि.मी. (४५ च्या खाली) अभिषेक देवकाते, दिलीप सिंग, वैभव शिंदे अमृता पटेल, रिंकी सिंग, खुशी सिंग
५ कि.मी. (४५ पुढील) रमेश चिवळकर, वसंत देसाई, अशोक काचोळे लोपमुद्रा कर, वृषाली शिंदे, विशाखा कोते
५ कि.मी. (४५ च्या आत) अतुल बर्डे, निलेश यादव, अभिनय यादव यामिनी ठाकरे, अमृता मांडवे, आश्लेषा झोळेकर

कार्पोरेट ५ कि.मी. खुला गट

  • पुरुष: अनुज करकरे, आकाश हिरवे, मयूर काकडे
  • महिला: सुवर्णा जाधव, प्रांजल लाहे, गौरी बढे

कार्पोरेट खुला गटातील सामूहिक संघ: एनप्रो इंडस्ट्रीज, विनिल हायटेक, रिषभ इंडस्ट्रिज


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!