news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड सरस्वती विश्व विद्यालय नॅशनल स्कुल ‘पुणे जिल्हा शिक्षण पुरस्कार – २०२५’ ने सन्मानित!

सरस्वती विश्व विद्यालय नॅशनल स्कुल ‘पुणे जिल्हा शिक्षण पुरस्कार – २०२५’ ने सन्मानित!

गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि महत्त्वपूर्ण योगदानाची पावती; निगडी प्राधिकरण येथील कार्यक्रमात राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते गौरव. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते सरस्वती विश्व विद्यालय नॅशनल स्कुलला ‘पुणे जिल्हा शिक्षण पुरस्कार’!

 


 

विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थेकडून चा पुरस्कार प्रदान; पिंपरी चिंचवडच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा

 

पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे, दिनांक १३/१०/२०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्था, पुणे जिल्हा यांच्या वतीने पिंपरी येथील सरस्वती विश्व विद्यालय नॅशनल स्कुलला प्रतिष्ठेचा “पुणे जिल्हा शिक्षण पुरस्कार – ” देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

केरळ राज्याचे सन्माननीय राज्यपाल श्री. राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नुकतेच निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात करण्यात आले होते

 

सरस्वती विश्व विद्यालय नॅशनल स्कुलच्या वतीने संस्थेचे संचालक विश्वनाथन नायर आणि सरस्वती नायर, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. क्षमा गर्गे, आणि पालक प्रतिनिधी अश्विन काळे यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

हा सन्मान शाळेच्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!