news
पिंपरीतील ‘श्रीटिकेल’ कंपनीच्या २७५ कामगारांनी केले रक्तदान; ‘वायसीएम’ मधील गरीब रुग्णांना मिळणार जीवनदान!पिंपरी-चिंचवडमधील १३४ मनपा शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी घुमला ‘ओंकार’ नाद! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभागपिंपरी-चिंचवड मनपा आणि योग विद्या धामच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ संकल्पनेवर भव्य योग सोहळा!रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त
Home पिंपरी चिंचवड ‘अपयशाने खचू नका, जिद्दीने अभ्यास करा’: MPSC टॉपर ममता औटे यांनी दिला यशाचा मंत्र

‘अपयशाने खचू नका, जिद्दीने अभ्यास करा’: MPSC टॉपर ममता औटे यांनी दिला यशाचा मंत्र

मराठा सेवा संघाच्या मेळाव्यात संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांचे मार्गदर्शन; शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारांवर संघटन वाढवण्यावर भर. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

स्पर्धा परीक्षेतील यश जिद्दीने मिळवावे: पुरूषोत्तम खेडेकर यांचे आवाहन!

 


 

मध्ये राज्यात दुसरी आलेल्या ममता औटे यांचा मराठा सेवा संघाकडून सत्कार; ‘सेवा संघाचे कार्य नव्या पिढीने पुढे न्यावे’

 

पिंपरी, प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक १३/१०/२०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड शहर मराठा सेवा संघाच्या वतीने संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) मंत्रालय सहाय्यक/ विक्रीकर निरीक्षक परीक्षेत मुलींमध्ये राज्यात द्वितीय आलेल्या ममता शशिकांत औटे हिचा सत्कार खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

पुरूषोत्तम खेडेकर यांनी यावेळी मराठा सेवा संघाचे कार्य शिव-शाहू-फुले-आंबेडकर या विचारांवर कक्षांतून सुरू असून, ते कार्य आता नव्या पिढीने अधिक जोमाने पुढे न्यावे, असे आवाहन केले. कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, कठीण परिस्थितीत जिद्दीने अभ्यास करून यश मिळवणाऱ्या ममता औटे यांचे कौतुक केले आणि समाजातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षा व उद्योग-व्यवसायात यश मिळवावे, असे विचार व्यक्त केले.

 

ममता औटे यांचा यशाचा मंत्र

 

सत्काराला उत्तर देताना ममता औटे म्हणाल्या, “अपयशाने खचून न जाता जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते.” मध्यमवर्गीय कुटुंबातील असूनही आई-वडिलांचा भक्कम पाठिंबा, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि जिजाऊंच्या प्रेरणेने हे यश मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

 

यावेळी शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, जिजाऊ ब्रिगेड शहराध्यक्षा सुलभा यादव, प्रविण कदम, उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन खामकर यांनी आपला कार्यअहवाल सादर केला आणि पुढील काळात करण्यात येणाऱ्या कामाच्या नियोजनाची माहिती दिली.

मराठा सेवा संघाचे विभागीय अधिवेशन, उद्योजक कक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन आणि कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. विभागीय अध्यक्ष प्राचार्य रामकिशन पवार यांनी मराठा सेवा संघाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी संजय ठाकर यांची निवड जाहीर केली आणि त्यांचा सन्मान करण्यात आला.

मार्गदर्शक अर्जुन तनपुरे यांनी मराठा सेवा संघ महाराष्ट्र तसेच देशभरातील इतर देशांमध्ये कार्य करत असल्याचे सांगितले.

यावेळी प्राचार्य रामकिशन पवार, प्रकाश जाधव, अभिमन्यू पवार, अॅड लक्ष्मण रानवडे, सुनिता शिंदे, माणिक शिंदे, मंचक जाधव, संभाजी ब्रिगेड चे सतिश काळे, गणेश दहिभाते, दिलीप गावडे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश जाधव यांनी केले, तर आभार अभिमन्यू पवार यांनी मानले.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!