सरन्यायाधीश भूषण गवईंवरील भ्याड हल्ल्याचा काँग्रेसकडून तीव्र निषेध!
पिंपरी-चिंचवड काँग्रेस (अनुसूचित जाती विभाग) वतीने दापोडी स्मारकाजवळ आंदोलन; ‘न्यायव्यवस्थेवरील हल्ले सहन करणार नाही’
पिंपरी-चिंचवड, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १३/१०/२०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा. भूषण गवई साहेब यांच्यावर दिल्ली कोर्टातील वकील राजेश किशोर याने केलेल्या जोडा भिरकावण्याच्या भ्याड हल्ल्याचा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाने तीव्र जाहीर निषेध केला.
हा निषेध ऑक्टोबर रोजी दापोडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे करण्यात आला.

आंदोलनाचे स्वरूप
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष डॉ. कैलासभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी डॉ. कैलास (भाऊ) कदम आणि शिवाजीनगर कोर्टाचे लोक अदालत पॅनलचे जज उमरणे अण्णा यांनी आपल्या तीव्र शब्दांमध्ये या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. त्यांनी देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि सर्वोच्च पदावर झालेल्या हल्ल्याबद्दल संताप व्यक्त केला.

या निषेध आंदोलनात अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष हिरामण मसू खवळे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते:
- कामगार नेते विष्णूपंत नेवाळे
- पिंपरी ब्लॉकचे अध्यक्ष विश्वनाथ जगताप
- युवकचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव
- सेलचे अध्यक्ष सोमनाथ शेळके
- शितलताई कोतवाल
- रवी कांबळे
- जन्नताई सय्यद
- भाऊसाहेब मुगुटमल
- बाबुलाल वाघमारे
- मयूर रोकडे
- विशाल कसबे
- अमर उदमले
- पोपट अरणे
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
